Rahul Gandhi, PM Narendra Modi in Rajasthan Assembly Elections 2023 Saam Tv
देश विदेश

National Politics News: 12000 कोटींचे विमान आणि 12 कोटींची कार; अमेरिका ते अदानींपर्यंत, राहुल गांधींनी PM मोदींना केलं लक्ष्य

Satish Kengar

Rahul Gandhi On Pm Narendra Modi:

मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील प्रचाराचा टप्पा संपल्यानंतर भाजप आणि काँग्रेसचे बडे नेते आता राजस्थानमध्ये प्रचार करत आहेत. काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी गुरुवारी राजस्थानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. नोहर, हनुमानगढ येथील सभेत राहुल म्हणाले की, पंतप्रधान मोदी 12 हजार कोटींच्या विमानात आणि 12 कोटींच्या कारमधून प्रवास करतात. ते (पंतप्रधान) कधी शेतकरी, मजूर, दुकानदार यांच्यासोबत दिसले आहेत का?

राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधानमोदी गरिबांमध्ये दिसत नाहीत तर अदानीसोबत दिसतात. ते म्हणाले, 'नरेंद्र मोदी 12 हजार कोटी रुपयांच्या विमानात आणि 12 कोटी रुपयांच्या कारमधून प्रवास करतात. गेल्या 10 वर्षात तुम्ही मोदींना कोणत्याही शेतकरी, मजूर किंवा छोट्या दुकानदारासोबत पाहिले आहे का? तुम्हाला ते विमानाने अमेरिकेत जाऊन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना भेटताना दिसतील. त्याचे फोटो तुम्हाला अदानीसोबत दिसेल, पण गरीब शेतकरी आणि बेरोजगार तरुणांसोबत नाही.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यावेळी राहुल गांधींनी श्रीगंगानगर, हनुमानगढ आणि चुरू येथे प्रचंड सभा घेतल्या आणि राजस्थानच्या गेहलोत सरकारचे कौतुक केले. राजस्थानमध्ये पोहोचल्यानंतर सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांच्यात ऐक्याचा संदेश देताना त्यांनी काँग्रेसला बहुमत मिळणार असल्याचा दावा केला.  (Latest Marathi News)

राहुल गांधींनी आपल्या सर्व सभांमध्ये पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आणि त्यांनी अदानींचा फायदा केल्याचा आरोप केला. श्री गंगानगरमध्ये ते म्हणाले, ''5 वर्षांपूर्वी मी गेहलोतजींना सांगितले होते की, भाजप सरकारने अदानीसारख्या लोकांना जेवढे पैसे दिले आहेत, तेवढे पैसे तुम्ही राजस्थानच्या गरीब लोकांच्या बँक खात्यात टाका. आम्ही नुकतीच सुरुवात केली आहे. मी नरेंद्र मोदी नाही, खोटी आश्वासने देत नाही. एकदा म्हटल्यावर मी ते करेन.''

राहुल गांधी म्हणाले, 'आम्हाला शेतकरी, मजूर, छोट्या दुकानदाराच्या मुलाने मोठी स्वप्ने पाहावीत आणि इंग्रजी शिकावे असे वाटते. आम्हाला असा भारत हवा आहे, ज्यात मजुराचा मुलगा परदेशात व्यवसाय करतो आणि मोठ्या अमेरिकन कंपन्यांमध्ये काम करतो. आम्हाला दोन भारत नको आहेत. एकीकडे शेतकरी आणि मजूर रक्त आणि घाम गाळतात, तर दुसरीकडे दोन-चार अब्जाधीश विमानात फिरतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

Maharashtra News Live Updates: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन मिळणार १०००० रुपये पेन्शन

SCROLL FOR NEXT