Rajsthan Accident News  AI Image
देश विदेश

Car Accident News : महामार्गावर भीषण अपघात! कारचा चक्काचूर,४ मित्रांचा मृत्यू , दोघे जखमी

Rajsthan Jaipur Car Accident News : राजस्थानमधील जयपूर जिल्ह्यातील रायसर परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १४८ वर भीषण कार अपघात झाला. टायर फुटल्याने कार दरीत कोसळली. या दुर्घटनेत आग्रा येथील चार तरुणांचा मृत्यू झाला असून, दोघे गंभीर जखमी आहेत.

Alisha Khedekar

  • राजस्थानमध्ये भीषण अपघात

  • जयपूर जिल्ह्यातील रायसर परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १४८ वर अपघात घडला

  • ४ तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

  • कारचा टायर अचानक फुटल्याने अपघात

राजस्थानमध्ये भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात ४ तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जयपूर जिल्ह्यातील रायसर परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १४८ वर आज सकाळी हा अपघात घडला. कारचा टायर अचानक फुटल्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्यालगत असलेल्या दरीत जाऊन कोसळली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कारमध्ये एकूण सहा मित्र प्रवास करत होते. हे सर्व तरुण उत्तर प्रदेशातील आग्रा येथील रहिवासी होते. खाटूश्यामजी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर ते आपल्या घरी परतत होते. प्रवासादरम्यान रायसर परिसरात अचानक कारचा टायर फुटला. त्यामुळे चालकाला वाहनावर नियंत्रण मिळवता आले नाही. काही क्षणांतच कार रस्त्यावरून घसरून दरीत कोसळली.

अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की, अतुल, मुकुल, रूपेश आणि शिवा या चार तरुणांचा मृत्यू झाला. तर राहुल आणि अर्पित हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बचावकार्य सुरू केले. जखमी दोघांनाही जयपूरमधील निम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शुक्रवारी पहाटे सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेनंतर महामार्गावर वाहनचालकांची गर्दी झाली आणि वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून अपघाताची माहिती गोळा केली. तसेच अपघातग्रस्त कार बाजूला करण्याचे आणि वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न करण्यात आले.

या प्रकरणी सीओ रामकिशन विश्नोई यांनी चार तरुणांचा मृत्यू झाल्याची आणि दोघे गंभीर जखमी असल्याची माहिती दिली. प्राथमिक माहितीनुसार, टायर फुटल्याने हा अपघात घडला. मात्र, दुर्घटनेची माहिती घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा महामार्गावरील वेग आणि वाहनांची सुरक्षितता यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WhatsApp Update : ...तर तुमचंही Whatsapp होणार बंद, तुम्ही तर ही चूक करत नाहीत ना? आताच जाणून घ्या

Maharashtra News Live Update: कुंभमेळा होत असलेल्या पंचवटीत मद्यविक्रीवर निर्बंध लावण्याची तयारीत

Loan Waiver: एकापेक्षा जास्त बँकांमध्ये कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय

Gauva Benefits For Diabetes Control: डायबिटीजच्या रूग्णांसाठी अत्यंत महत्वाची माहिती, पेरू खाताना 2 चुका टाळा नाहीतर, रक्तातील साखर वाढेल

PM Kisan Yojana : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ₹2,000 जमा होणार? 24व्या हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT