RajasthanElectionResults saam tv
देश विदेश

मुख्यमंत्र्यांच्या जिल्हयात भाजपचा दारुण पराभव! काँग्रेसचा 21 जागांवर दणदणीत विजय; वारं फिरलं?

Rajasthan Local Body Election Results: राजस्थानच्या भरतपूर जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसने 31 पैकी 21 जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या जिल्ह्यात भाजपला केवळ 9 जागांवर समाधान मानावे लागले.

Omkar Sonawane

राजस्थानमधील पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून भरतपूरमध्ये काँग्रेसने मोठे यश मिळवले आहे. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या जिल्ह्यातच भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. भरतपूर जिल्हा परिषदेच्या 31 पैकी तब्बल 21 जागांवर काँग्रेसने विजय मिळवत स्पष्ट बहुमताकडे वाटचाल केली आहे. तर भाजपला फक्त 9 जागांवर समाधान मानावे लागले आहे. एका जागेवर आरएलपीच्या उमेदवाराने बाजी मारली आहे.

जिल्हा परिषदेत कोणत्या पक्षाला किती जागा?

काँग्रेस - 21 जागांवर विजय

भाजप - 9 जागांवर विजय

आरएलपी - 1 जागेवर विजय

काँग्रेसच्या राजेश, अरविंद, चेतन, हरिसिंह, हरबीर सिंह, हीराचंद, सावित्री देवी, अशोक, सपना, प्रमोद, रानुवाला, सरोज, हरप्यारी, अंजू कुमारी, सुमन गुर्जर, रेखा कुमारी, ओमवती आणि बोदन सिंह यांच्यासह एकूण 21 उमेदवार विजयी झाले आहेत. दुसरीकडे भाजपच्या संगीता, राधा, सतीवीर, मिथिलेश, पूजा कुमारी, मीरा देवी, मानसिंह, दिनेश भातरा आणि रघुवीर सिंह यांनी विजय मिळवला. तर प्रभाग क्रमांक 26 मधून आरएलपीच्या रेनू कुमारी यांनी बाजी मारली.

मागील निवडणुकीत भाजपची सरशी

मागील जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने 17 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला होता. काँग्रेसला 14 जागांवर विजय मिळाला होता. तर अपक्षांनी 4 आणि बसपाने 2 जागा जिंकल्या होत्या. मात्र, यंदाच्या निवडणुकीत चित्र पूर्णपणे बदललं असून काँग्रेसने भाजपला मोठा धक्का दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मासिक पाळीमुळे चाचणी चुकणार नाही! महिला पोलीस उमेदवारांसाठी सरकारचा दिलासादायक निर्णय

Maharashtra News Live Update: गडचिरोलीत अवकाळीचा शेतकऱ्यांना फटका

प्राणीप्रेमींसाठी खास पर्वणी! पुण्यात 'सकाळ पेटोपिया २०२६' महोत्सवाला सुरुवात; शहामृग अन् मकाऊ पोपट ठरतायत मुख्य आकर्षण

माजी शिक्षणमंत्र्यासह 565 जणांना अटक; सरकारच्या माजी प्रमुखाचं घर जाळलं, आणखी एक देश सत्तांतराच्या उंबरठ्यावर

Train Facts : रेल्वेच्या ट्रेन क्रमांकात दडलाय खास कोड! प्रत्येक अंक सांगतो गाडीची माहिती

SCROLL FOR NEXT