rajasthan Shocking News Saam tv
देश विदेश

Shocking : धक्कादायक! नदीत अंघोळ करणे जीवावर बेतलं; ११ जण पाण्यात बुडाले, ८ मित्रांचा दुर्दैवी अंत

rajasthan Shocking News: राजस्थानात नदीत बुडून ८ मित्रांचा मृत्यू झाला आहे. ११ जण नदीत अंघोळीसाठी उतरले होते. त्यातील ८ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.

Vishal Gangurde

राजस्थानच्या टोंकमध्ये मोठी दुर्घटना घडली घडली आहे. राजस्थानच्या बनास नदीत ११ जण बुडाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचलं. पोलीस आणि बचाव पथकाच्या जवानांनी ८ जणांचे मृतदेह नदीतून बाहेर काढले आहेत. मृत ८ जण जयपूरचे राहणारे आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, राजस्थानमधील ११ मित्र अंघोळ करण्यासाठी मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास नदीत उतरले. मात्र, या ११ जणांना नदीच्या खोल पाण्याचा अंदाज आला नाही. ११ मित्र पाण्यात बुडाले. त्यातील ८ जणांचा मृत्यू झाला. तर तिघांचा जीव वाचवण्यात यश आलं आहे. एसपी विकास सांगवान यांनी सांगितलं की, मंगळवारी दुपारी कच्चा बांधजवळ जुन्या पुलाजवळ ही घटना घडली. सर्व तरुण २५ ते ३० वयोगटातील आहेत.

जयपूरहून सर्व जण पिकनिकसाठी टोंक येथे पोहोचले होते. वाचवण्यात आलेल्या तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या दुर्घटनेनंतर टोंक जिल्हा रुग्णालयाच्या बाहेर मोठी गर्दी झाली आहे. या घटनेवरून राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे.

भजनलाल शर्मा यांनी म्हटलं आहे की, 'टोंक जिल्ह्यातील बनास नदीत बुडून युवकांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी मदतीचे निर्देश दिले. घटनेतील मृतांच्या आत्म्याला शांती मिळो. मृतांच्या नातेवाईकांप्रती सहवेदना व्यक्त करतो. त्यांना या दु:खातून बाहेर पडण्याचं बळ पडो'.

सचिन पायलट यांनी म्हटलं की, 'टोंकमध्ये फिरायला आलेल्या जयपूरमधील तरुणांचा बनास नदीत मृत्यू पावल्याची घटना दुर्दैवी आहे. या घटनेतील मृत तरुणांच्या नातेवाईवाईकांच्या प्रती संवेदना व्यक्त करतो. ईश्वर त्यांना या दु:खातून बाहेर पडण्याचे बळ मिळो. काही युवकांना वाचवण्यात यश मिळालं आहे. ही घटना घडल्यानंतर प्रशासन आणि पोलिसांना मदतीचे निर्देश देण्यात आले होते. या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना सर्व प्रकारची मदत उपलब्ध करून दिली जाईल'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT