India Tv
देश विदेश

Accident: भरदुपारी रस्त्यावर उठल्या किंचाळ्या अन् काही क्षणात १२ जणांचा मृत्यू, लक्ष्मण गडमध्ये भीषण बस अपघात

Accident: राजस्थानमधील सीकरमधील लक्ष्मण गड येथे अपघाताची घटना घडलीय. सालासरकडून येणारी बस पुलाच्या कठड्याला धडकल्याने ११ जणांचा मृत्यू झालाय.

Bharat Jadhav

राजस्थानमधील सीकर जिल्ह्यात मंगळवारी दुपारी एक भीषण अपघात झाला. यात १२ जणांचा मृत्यू झाला तर २० जखमी झालेत. लक्ष्मण गड परिसरात लक्ष्मण गड कल्व्हर्टवर प्रवाशांनी भरलेली खासगी बसचा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, खासगी बस अनियंत्रित झाली आणि पुलाच्या कठड्याला धडकली. यात बसचं मोठं नुकसान झालं. चालकाच्या बाजूचे मोठे नुकसान झाले. या अपघातात १२ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर २० हून अधिक जण जखमी झाले आहेत. या बसमध्ये जवळपास ४० जण प्रवास करत होते.

पोलिसांना अपघाताची महिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना लक्ष्मण गड आणि सीकर येथील रुग्णालयात दाखल केलं. तर मृत झालेल्या व्यक्तींना पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहे. हा अपघात कसा झाला याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. सीकर येथील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात मंगळवार दुपारी २ वाजता झाला. प्रत्यक्षदर्शींच्या मते, बस अचानकपणे अनियंत्रित झाली.

पुलावर येताच बस इकडून तिकडे होते होती, त्याचवेळी बस पुलाच्या कठड्याला धडकली. त्यामुळे बसच्या एका बाजुचं मोठे नुकसान झाले. या अपघातानंतर बसमध्ये बसलेल्या प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडालीय. घटनास्थळी उपस्थित लोकांनी तातडीने पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली आणि घटनास्थळी बचावकार्य सुरू केले आहे.

सुचना मिळाल्यानंतर सीकरचे पोलीस उपायुक्त शाहीन सी आणि अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी रतन कुमार हे घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस तपास केला जात आहे. पोलीस निरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात आतापर्यंत १२ जणांचा प्रवास २० पेक्षा अधिक लोक जखमी झालेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जखमींवर योग्य उपचार करा

मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी या घटननंतर शोक व्यक्त केलाय. जखमींना योग्य उपचार करा अशा सुचना मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी दिलेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करताना ते म्हणाले, सीकरच्या लक्ष्मण गड परिसरात बस अपघात झालाय. यात झालेल्या जीवितहानीमुळे अत्यंत दु:ख होत असल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Married Life: वैवाहिक जीवन यशस्वी करायचं , 'या' सवयीचा अवलंब करा..

SCROLL FOR NEXT