उत्तर भारतातील दसरा उत्सवाला पावसाचा मोठा फटका बसला.
दिल्ली, नोएडा, पाटणा आणि जौनपूर येथे रावणाचे पुतळे कोसळले.
रावण दहनाच्या आधीच पुतळ्यांचे मुंडके उडाले किंवा ते पडलं.
विजयादशमीनिमित्त दिल्ली-एनसीआरसह देशभरातील अनेक शहरांमध्ये रावण दहनचा कार्यक्रम केला जातो. पण पावसामुळे या कार्यक्रमात व्यत्यय आलाय. उत्तर प्रदेशातील नोएडा, दिल्ली, पाटणा आणि जौनपूरसह अनेक शहरांमध्ये अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे रावण दहनाच्या कार्यक्रमावर परिणाम झालाय.
आपल्या शक्तीनं देव लोक आणि पातळ लोकात साम्राज्य करणारा राक्षस राजा रावणाला वरुणराजानं पराभूत केलं. देवांना सळो की पळो करणाऱ्या रावणाचा खूप दरारा होता. मात्र रावणाच्या पुतळ्याना वरुणराजाचा चांगलाच मार खावा लागला. विजयादशमीच्या दिवशी रावण दहनाचा कार्यक्रम साजरा केला जातो. या कार्यक्रमाच्या आधी पावस होत असल्यानं रावणाचे पुतळे कोसळले आहेत. कुठे रावणाच्या पुतळ्याचे मुंडकं उडलं तर कुठे पुर्ण पुतळा पडलाय.
नोएडाच्या रामलीला मैदानावर मुसळधार पाऊस सुरू होताच, रावण, मेघनाद आणि कुंभकर्ण यांचे पुतळे पाण्यात भिजू लागले. पावसापासून वाचण्यासाठी प्रेक्षक इकडे तिकडे धावू लागले. पावसामुळे मेळाव्यात व्यत्यय आला, ज्यामुळे कार्यक्रमात व्यत्यय आला. पुतळा पाहण्यासाठी बरेच लोक आले होते, परंतु पावसामुळे त्यांना परिसर सोडावा लागला.
दिल्लीतील इंद्रप्रस्थ येथील रामलीला मैदानावरही पावसामुळे रावण दहनाच्या उत्साह कमी झालाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनापूर्वीच मुसळधार पाऊस सुरू झाला, ज्यामुळे रावणाच्या कुटुंबाचे आणि दहशतवादाचे प्रतीक असलेल्यांचे पुतळे भिजले. लाल किल्ल्यावरील रामलीला कार्यक्रमातही पावसाचा व्यत्यय आला. पुतळे ओले होऊ लागले, त्यामुळे आयोजकांची चांगलीच भांबेरी उडालीय.
उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील शाहगंज येथील रामलीला मैदानावर मुसळधार पावसात रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यात आलं. पावसामुळे पुतळा कोसळला, होता, परंतु आयोजकांनी तो तसाच जाळला. प्रेक्षकांनी छत्र्यांसह आणि पावसात भिजून दहन सोहळा पाहिला.
दरम्यान, संभल जिल्ह्यात पावसामुळे रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांच्या पुतळ्यांचे मोठे नुकसान झाले. अचानक आलेल्या मुसळधार पावसाने रामलीला मैदानातील भव्य पुतळे पूर्णपणे भिजले आणि अनेक भागांचे नुकसान झाले.
पाटण्यातील गांधी मैदानात रावण दहनाची तयारी सुरू असतानाच आकाशात काळे ढग जमा झालेत. मुसळधार पाऊस पडला. फटाक्यांनी सजवलेले रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांचे महाकाय पुतळे पूर्णपणे भिजले. मुसळधार पावसामुळे रावणाचे मुडकं उडालय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.