Rahul Gandhi- PM Modi
Rahul Gandhi- PM Modi Saam TV
देश विदेश

Rahul Gandhi on PM Modi : राहुल गांधी PM नरेंद्र मोदींच्या एका भूमिकेशी सहमत, केंद्र सरकारला दर्शवला जाहीर पाठिंबा

साम टिव्ही ब्युरो

Rahul Gandhi : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. याठिकाणी ते अनेक कार्यक्रमांना उपस्थिती लावत आहे. मागील दोन दिवसांतील कार्यंक्रमांमध्ये राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर सडकून टीका करताना दिसले.

राहुल गांधींनी मोदी सरकारवर सरकारी संस्थांचा, यंत्रणांचा गैरवापर, विरोधी पक्षांची गळचेपी करण्यासारखे अनेक गंभीर आरोप लावले. एकीकडे आगपाखड करणाऱ्या राहुल गांधींनी मोदी सरकारने घेतलेल्या एका भूमिकेवर सहमत असल्याचं जाहीरपणे सांगितलं. (Latest Marathi News)

राहुल गांधी यांनी रशिया-युक्रेन युद्धावर भारताची भूमिका योग्य असल्याचं म्हटलं आहे. राहुल गांधी स्टॅनफोर्ड विद्यापीठात एका संवाद कार्यक्रमात सहभागी झाले होते. यादरम्यान रशिया-युक्रेन युद्धासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर राहुल गांधी यांनी आपण या मुद्द्यावर मोदी सरकारसोबत असल्याचे स्पष्ट केले.  (Latest Political News)

राहुल गांधी यांनी म्हटलं की, आमचे (भारताचे) रशियाशी संबंध आहेत. रशियावर आपले काही अवलंबित्व आहेत. त्यामुळे माझी भूमिका भारत सरकारसारखीच असेल. शेवटी आपल्याला आपले हितही जपले पाहिजे.

भारत मोठा देश असल्याने त्याचे संबंध अनेक देशांसोबत आहे. भारताचे काही देशांशी चांगले संबंध असतील तर इतर देशांशी संबंध विकसित होत आहेत. परंतु एखाद्या देशाशी भारताचे संबंध राहणार नाहीत असे अवघड आहे. भारत हा एवढा छोटा आणि आत्मनिर्भर देश नाही की तो केवळ एका देशाशी संबंध ठेवेल आणि इतरांशी नाही, असं राहुल गांधींनी म्हटलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : मेषसह ५ राशीच्या लोकांनी आज 'या' गोष्टी करणं टाळा; वाचा आजचे राशीभविष्य

Maharashtra Politics: सातारा, दुष्काळ आणि शरद पवार; साताऱ्याच्या सभेत देवेंद्र फडणवीस यांची चौफेर फटकेबाजी

SUV Cars in India: जबरदस्त लूक आणि पॉवरफुल इंजिन, 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत येतात या SUV

Porsche New Car: व्हॉईस कमांड, 6 एअरबॅग्ज आणि 270kmpl स्पीड; पोर्शची डॅशिंग कार भारतात लॉन्च

Mumbai News : जेव्हीएलआर मार्गावरील वाहतुकीत ३१ मे पर्यंत बदल, नेमकं काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT