व्होट चोरीचा पर्दाफाश केल्यानंतर राहुल गांधींनी आता निवडणूक आयोगाला खिंडीत गाठलंय... संसद ते सडकच नाही तर राहुल गांधींनी डिजिटल प्रचारात माहीर असलेल्या भाजपच्याच रणनीतीचा वापर करुन निवडणूक आयोग आणि भाजपविरोधात मोर्चा उघडलाय... त्यामुळे राहुल गांधींच्या सिक्रेट प्लॅनमुळे भाजप आणि निवडणूक आयोगाला घाम फुटलाय...
व्होट चोरीविरोधात डिजिटल मोहीम (HEADER) (राहुल गांधी फोटो)
24 तासांत 15 लाखांपेक्षा जास्त समर्थन सर्टिफिकेट डाऊनलोड
व्होट चोरीविरोधात 9650003420 या नंबरवर 10 लाखांपेक्षा जास्त मिसकॉल
मताचा अधिकार अबाधित ठेवण्यासाठी व्होट चोरीविरोधात एकत्र या
खरंतर विरोधी पक्षनेते बनल्यानंतर राहुल गांधींनी भाजपला चांगलंच धारेवर धरलंय... . त्यातच आता व्होट चोरीच्या मुद्द्यावरुन राहुल गांधींनी पुरावे सादर करत निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवरचं प्रश्न उपस्थित केलेत.. तर दुसरीकडे विखुरलेल्या इंडिया आघाडीची मोट बांधून संसद ते निवडणूक आयोगाचं कार्यालय असा 300 खासदारांचा मोर्चा काढला... त्यातून राहुल गांधींनी इंडिया आघाडीचं नेतृत्व आपल्याकडेच असल्याचं पुन्हा एकदा दाखवून दिलंय...त्यामुळेच ठाकरेसेनेनं राहुल गांधींच्या या आंदोलनाची तुलना थेट जयप्रकाश नारायणांच्या नवनिर्माण आंदोलनाशी केली.
राहुल गांधींनी भारत जोडोच्या माध्यमातून रस्त्यावर जनआंदोलन उभं केलं... तर आता राहुल गांधींनी व्होट चोरीच्या मुद्द्यावरुन संसद, रस्ता आणि डिजिटल माध्यमातूनही निवडणूक आयोगाची डोकेदुखी वाढवलीय... एवढंच नाही तर पिक्चर अभी बाकी है सांगत थेट भाजपलाच इशारा दिलाय..
बोगस मतदानाविरोधात दिल्लीत विरोधी पक्षांचे तब्बल ३०० खासदार रस्त्यावर उतरले. मुळात राहुल गांधींनी छेडलेल्या मोहिमेला मिळालेलं हे यश मानलं जातंय. त्यामुळे राहुल गांधी पुढच्या काळात भाजपला रोखण्यासाठी नेमकी कोणती रणनीती अवलंबणार? याचीच उत्सुकता आहे....
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.