राहुल गांधी यांची तृणमूल काँग्रेसवर टीका saam tv
देश विदेश

काँग्रेस कार्यकर्त्याच्या हत्येनंतर राहुल गांधी कडाडले; म्हणाले, बंगालमध्ये लोकशाही नाही..

‘No Democracy in Bengal’: Rahul Gandhi Reacts to Congress Worker Killing : विधानसभा निवडणुका होत असतानाच पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण चिघळले आहे. काँग्रेस कार्यकर्त्याच्या हत्येनंतर राहुल गांधी भडकले असून, पश्चिम बंगालमध्ये लोकशाही नाही. तृणमूल काँग्रेसची दहशत आहे, असं ते म्हणाले.

Nandkumar Joshi

पश्चिम बंगालमध्ये निवडणुका सुरू असतानाच, काँग्रेस कार्यकर्ता देबदीप चॅटर्जी यांच्या हत्येच्या घटनेमुळं राजकीय वातावरण तापलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तृणमूल काँग्रेसवर कडाडून टीका केली आहे. या घटनेचा राहुल गांधी यांनी निषेध नोंदवला. (congress worker killed asansol rahul gandhi reaction) काँग्रेस अशा राजकारणासमोर झुकणार नाही. भारताच्या अहिंसावादी परंपरेला डाग लावणाऱ्या अशा राजकीय प्रवृत्तीसमोर आमचा पक्ष झुकणार नाही, असे ते म्हणाले.

राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकर्त्याच्या हत्येच्या घटनेनंतर तृणमूल काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. पश्चिम बंगालमध्ये नुकतेच मतदान झाल्यानंतर घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेवेळी आसनसोलमध्ये काँग्रेस कार्यकर्ता चॅटर्जी यांची निर्घृण हत्या करण्यात आली. चॅटर्जी हे आसनसोल उत्तरचे काँग्रेस उमेदवार प्रसेनजीत पुइतांडी यांचे जवळचे सहकारी होते, असे पक्षाचे म्हणणे आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चॅटर्जींना बेदम मारहाण केली. काही वेळाने त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप पश्चिम बंगाल काँग्रेसने केला आहे.

राहुल गांधी यांनी या घटनेवर आज, रविवारी एक्सवर पोस्ट केली. तृणमूलच्या गुंडांकडून काँग्रेस कार्यकर्ता देबदीप चॅटर्जी यांची हत्या ही निंदनीय घटना आहे. चॅटर्जी यांच्या कुटुंबीयांप्रती त्यांनी दुःखही व्यक्त केला. पश्चिम बंगालमध्ये आजघडीला लोकशाही नाहीच. तृणमूलची दहशत आहे. मतदानानंतर विरोधकांना धमकावणं, त्यांच्यावर हल्ला करणे आणि त्यांचा आवाज दाबणे हा तृणमूल काँग्रेसचा मूळ स्वभाव झाला आहे, असं राहुल गांधी यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

काँग्रेसचं राजकारण हिंसेवर आधारित नाही आणि कधीही राहणार नाही. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना गमावलं आहे. तरीही आम्ही अहिंसा आणि संविधानाचा मार्ग निवडला आहे. हाच आमचा वारसा आहे. हाच आमचा संकल्प आहे. या घटनेतील सर्व दोषींना तात्काळ अटक करावी. त्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी. देबदीपच्या कुटुंबीयांना सुरक्षा आणि नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi compulsory: 'मराठीला विरोध करणाऱ्या रिक्षाचालकांवर संतापला बिग बॉस फेम अभिनेता; म्हणाला, 'इथं राहायचं असेल तर...'

भरगर्दीत तरुणीनं हात पकडून ओढलं अन्...; हॉटेलमध्ये जाताना अभिषेक शर्मासोबत घडला धक्कादायक प्रकार

Maharashtra News Live Update: - TCS कंपनी महाराष्ट्रात नव्हे अख्या भारतासह जगभरात - छगन भुजबळ

Maharashtra Heatwave : महाराष्ट्रात उष्णतेची तीव्र लाट! कोणत्या जिल्ह्यांत किती आहे तापमान? जाणून घ्या

Gas Burner Cleaning: गॅस बर्नरवरचे काळे डाग 5 मिनिटांत गायब! ही सोपी ट्रिक पाहून तुम्हीही थक्क व्हाल

SCROLL FOR NEXT