मणिपूर हिंसाचार प्रकरणावरून लोकसभेत विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव मांडला होता. सत्ताधारी एनडीएने हा प्रस्ताव जिंकला. सलग तीन दिवस या अविश्वास प्रस्तावाववर चर्चा झाली. शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरच्या मुद्द्यावर बोलले.
मात्र जवळपास अडीच तासांच्या भाषणात मोदींनी शेवटची काही मिनिटं मणिपूरमधील हिंसाचाराच्या मुद्द्यावर भाष्य केलं. यावरुन काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर सडकून टीका केली.
मणिपूर हिंसाचारासारख्या गंभीर विषयावर चर्चा सुरु असताना मोदी सभागृहात हसत होते. हे त्यांना अशोभनिय आहे तसेच ही बाब अत्यंत गंभीर आहे. मणिपूर जळत राहावं ही भाजपचं इच्छा आहे. भाजपने मणिपूरमध्ये भारताची हत्या केली. हे मी सभागृहात बोललो होतो आणि मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे.
पंतप्रधान मोदी संसदेत मणिपूरवर २ मिनिटे बोलले. मणिपूरमध्ये अनेक महिन्यांपासून धुमसतंय, लोक मरत आहेत. महिलांवर अत्याचार होत आहेत. मणिपूरमध्ये ही परिस्थिती असताना पंतप्रधान हसत हसत बोलत होत, चेष्टा करत होते. पंतप्रधानांना शोभत नाही. अविश्वास प्रस्तावाचा विषय काँग्रेस पक्ष नव्हता, मणिपूर होता, याची आठवण राहुल गांधींनी करुन दिली.
मणिपूरमध्ये जे घडत आहे ती भारताची हत्या आहे. भारतीय सैन्याची ताकद सगळ्यांना माहित आहे. मणिपूरमध्ये काही चालले आहे ते भारतीय सैन्य दोन दिवसांत थांबवू शकते. पण पंतप्रधान मोदींना मणिपूर जळत ठेवायचे आहे, विझवायचे नाही, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.