Rahul Gandhi Saam Tv
देश विदेश

Rahul Gandhi: 'पॅलेटगन वापरण्याचे आदेश गृहमंत्र्यांचेच'; राहुल गांधींच्या आरोपामुळे लोकसभेत घमासान

Rahul Gandhi: दिल्लीच्या आंदोलनात पॅलेट गनमुळे चार विद्यार्थी जखमी झाले. तर एका आंदोलकांला आपली दृष्टी गमवावी लागलीय. मात्र पॅलेट गनच्या वापरचे आदेश पोलिसांना नेमके कुणी दिले? याचं मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने आलेत. पाहूयात यावरचा स्पेशल रिपोर्ट.

Suprim Maskar

Rahul Gandhi: लोकसभेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू असताना विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात मोठा संघर्ष पाहायला मिळाला. लोकसभेत परीक्षा सुधारणा विधेयकावर बोलताना राहुल गांधी यांनी विद्यार्थी आंदोलनाचे उघडपणे कौतुक करत थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधत गंभीर आरोप केले. 'पॅलेटगनचा वाप गृहमंत्र्यांच्या आदेशानंच केल्याचा दावा राहुल गांधींनी केलाय..एवढंच नव्हे तर गृहमंत्र्यांमध्ये लोकसभेत येण्याची हिंमत नसल्याचीही टीका राहुल गांधींनी केली.

त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी संसदेत प्रचंड गदारोळ केला. त्यानंतर अखिलेश यादव राहुल गांधींच्या मदतीला धावून आले आणि सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला...मात्र राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी मंत्री किरेन रिजिजूंनी दिली.

तर दुसरीकडे कामकाज पुन्हा सुरु झाल्यावर केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी गोळीबार झालाच नसल्याचा अजब दावा केला. तसचं पॅलेट गन चालवण्याचे आदेश गृहमंत्री नव्हे तर मॅजिस्ट्रेट देत असल्याचं त्यांनी सांगितलं. असं असेल तर मग गृहमंत्री लोकसभेत येऊन निवेदन का करत नाहीत, असा सवाल राहुल गांधींनी केला.

मुळात लाठीचार्ज आणि पॅलेटगनचा वापर झाल्यानंतर लोकसभा अधिवेशानाच्या सुरूवातीपासूनच राहुल गांधी अमित शाहांनी लोकसभेत निवेदन करण्याची मागणी केली. या मागणीमुळे पहिल्या आठवड्यात परीक्षा सुधारणा विधेयकावर ना चर्चा होऊ शकली ना विधेयक पारित होऊ शकलं. मात्र तरीही गृहमंत्री अमित शाहांनी विरोधकांची मागणी धुडकावून लावली. अखेर गृहमंत्र्यांच्या अनुपस्थितीतच विधेयक मंजूर झाले आणि वादावर पडदा पडला. मात्र पॅलेटगन चालवण्याचे आदेश कुणी दिले हे देशाला कधी कळणार याबाबत उत्सुकता लागलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आमदार जितेंद्र आव्हाडांचा भाजप-शिवसेनेवर निशाणा; महापालिकेच्या कारभारावरही सवाल

PNG Connection : पाईप गॅस कनेक्शनबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय; १ सप्टेंबरपासून लागू होणार नवा नियम

Tenant Verification : पुण्यात भाडेकरूंची माहिती न देणाऱ्या घरमालकांवर कारवाई; १७० गुन्हे दाखल

Mouth Odour : बोलताना तोंडाचा वास येतोय? या 6 घरगुती टिप्सने वास होईल गायब

Shiv Sena Supreme Court Hearing : शिवसेना कोणाची ठाकरेंची की शिंदेंची? कोर्टातील १० महत्त्वाचे मुद्दे

SCROLL FOR NEXT