Rahul Gandhi About Savarkar News SAAM TV
देश विदेश

Rahul Gandhi News: राहुल गांधींना मोठा धक्का; गुजरातच्या हायकोर्टाच्या न्यायधीशांकडून बाजू ऐकून घेण्यास नकार

Rahul Gandhi News: गुजरात उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश गीता गोपी यांचा राहुल गांधी यांची बाजू ऐकण्यास नकार दिला आहे. यामुळे राहुल गांधी यांचं प्रकरण दुसऱ्या न्यायाधीशांकडे वर्ग केली जाणार आहे.

Shivaji Kale

Rahul Gandhi news: काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांना ‘मोदी’ नावावर केलेल्या टिपण्णी प्रकरणात मोठा धक्का बसला आहे. गुजरात उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश गीता गोपी यांचा राहुल गांधी यांची बाजू ऐकण्यास नकार दिला आहे. यामुळे राहुल गांधी यांचं प्रकरण दुसऱ्या न्यायाधीशांकडे वर्ग केली जाणार आहे. (Latest Marathi News)

‘मोदी’ नावावर केलेल्या टिपण्णी प्रकरणात राहुल गांधी यांनी गुजरात उच्च न्यायालयात अपील केलं होतं. सुरत न्यायालयाने दिलेली २ वर्षाची शिक्षेला स्थगिती द्यावी ही याचिका सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर राहुल गांधी यांनी गुजरात उच्च न्यायालयात अपील केलं होतं.

२३ मार्चला सुरत येथील न्यायालयाने राहुल गांधी यांना ‘मोदी’ नावावर केलेल्या टिपण्णी वर २ वर्षाची सजा सुनावली होती. त्यानंतर त्यांचं लोकसभा सदस्य पद देखील गेलं होतं.

त्यानंतर राहुल गांधी यांनी सुरत सत्र न्यायालयात या संदर्भात अपिल केलं होतं. न्यायालयात केलेल्या अपिलमध्ये कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या शिक्षेला स्थगिती द्यावी अशी मागणी केली होती.

ही याचिका गुरूवारी सत्र न्यायालयात फेटाळली. त्यानंतर राहुल गांधी यांचं गुजरात उच्च न्यायालयात अपिल केलं होतं. यावर न्यायाधीश गीता गोपी यांनी राहुल गांधी यांच्या केसमधून माघार घेतली आहे.

या प्रकरणात याचिकाकर्ते पुर्णेश मोदी यांना न्यायालयाने नोटीस बजावली होती. या प्रकरणावर पुर्णेश मोदी यांनी न्यायालयाला आपलं म्हणणं सादर करत ही जिंकणे किंवा हारण्याची लढाई नाही. ही समाजिक लढाई असल्याचं म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण?

राहुल गांधी यांनी कर्नाटक येथील एका रॅलीत १३ एप्रिल २०१९ ला ललित मोदी, निरव मोदी, नरेंद्र मोदी यांची नाव कॉमन(एक सारखी) का आहेत? सगळ्या चोराचे नाव मोदी का असतं?असं विधान केलं होतं. यावर भाजप आमदार पुर्णेश मोदी यांनी या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. यावर राहुल गांधी यांना न्यायालयाने २ वर्षाची शिक्षा सुनावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT