Rahul Gandhi during a political protest in Delhi; his statement on facing 100 FIRs has brought renewed attention to the legal cases involving the Congress leader. saam tv
देश विदेश

राहुल गांधींची बेधडक आंदोलने, आतापर्यंत किती अन् कुठे-कुठे गुन्हे दाखल? वाचा Special Report

How many criminal cases are pending against Rahul Gandhi in India: दिल्लीतील आंदोलना प्रकरणी राहुल गांधीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय...मात्र जनतेच्या प्रश्नांसाठी राहुल गांधींनी गुन्ह्यांची शंभरी पार करण्याचा इशारा नेमका का दिला? राहुल गांधींवर नेमके किती गुन्हे दाखल आहेत? कोणत्या प्रकरणांमध्ये राहुल गांधींवर गुन्हे दाखल झालेत...पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

ऐकलतं... 6 आणि 7 ऑक्टोबरला विरोधकांनी दिल्लीत पुकारलेल्या आंदोलनानंतर राहुल गांधींवर FIR दाखल झाली...मात्र लोकशाही वाचवण्यासाठी अशा 100 FIR अंगावर घ्यायला तयार असल्याचं राहुल गांधींनी ठणकावून सांगितलयं.. ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झालेले असताना दिल्ली पोलिसांनी विरोधी पक्षाच्या अनेक खासदारांना ताब्यात घेतलं... मात्र विरोधी खासदारांना ताब्यात घेतल्यावर माध्यमांसमोर येऊन राहुल गांधींनी सत्ताधाऱ्यांना कसं आव्हान दिलयं...ऐका...

मात्र राहुल गांधींवर गुन्हा दाखल होण्याची ही काही पहिली वेळ नाही..2024 च्या लोकसभा निवडणुकीत रायबरेली मतदारसंघातून अर्ज दाखल करताना राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावर विविध न्यायालयात 18 ते 19 प्रलंबित गुन्हे असल्याचे जाहीर केले होते. यातील बहुतांश गुन्हे मानहानीचे आहेत...यातील काही निवडक गुन्ह्यांबद्दल जाणून घेऊया...

1)नॅशनल हेराल्ड प्रकरण - 2012

काँग्रेस पक्षाशी संबंधित असलेल्या 'असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड या कंपनीच्या ताबा आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधीत राहुल गांधींवर गुन्हा दाखल

2)RSS विरोधी वक्तव्य - 2014

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भिवंडीत राहुल गांधी यांनी महात्मा गांधींच्या हत्येमागे RSS असल्याचा आरोप केला. याप्रकरणी संघ कार्यकर्त्यानं अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला

3)बंगळुरूत RSS मानहानी प्रकरण - 2017

पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर राहुल गांधी यांनी 'RSS आणि भाजपच्या विचारसरणीमुळे' ही हत्या झाल्याचे वक्तव्य केले होते. याविरोधात भाजप कार्यकर्त्यांनी मानहानीचा खटला दाखल केला.

4)अमित शाह यांच्यावरील वक्तव्य– 2018

शाहांचा उल्लेख ‘खुनाचा आरोपी’ असा केल्यानं राहुल गांधींवर मानहानीचा दावा

5)मोदी आडनाव प्रकरण – 2019

सर्व चोरांची नावं मोदीचं का? असा वादग्रस्त सवाल उपस्थित केल्यानं राहुल गांधींवर मानहानीचा खटला

6)सावरकरांविरोधातील वक्तव्य - 2023

स्वातंत्र्यवीर सावरकरांविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राहुल गांधींवर मानहानीचा गुन्हा दाखल

7)भारत जोडो यात्रेत हिंसाचाराचा आरोप - 2024

राहुल गांधी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलिसांचे बॅरिकेड्स तोडले, सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला केला आणि हिंसाचार भडकवला असा आरोप करत आसाम पोलिसांनी गांधी यांच्यावर FIR दाखल केला.

निवडणूक अर्जातील 19 अधिकृत प्रकरणांव्यतिरिक्त, देशभरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये राजकीय आंदोलने, निदर्शने, रस्ते अडवणे आणि परवानगीशिवाय प्रवेश करणे या कारणांवरून दाखल झालेल्या पोलीस तक्रारी आणि FIR ची संख्या जोडल्यास हा आकडा 45 च्या घरात पोहोचतो. अशातच ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलनामुळे राहुल गांधींवर दोन गुन्हे दाखल झालेत... एकीकडे अनेक राजकीय नेत्यांवर खंडणी, खून, अतिक्रमण अशा प्रकरणात गुन्हे दाखल असताना देशाच्या विरोधी पक्षनेत्यावर जनतेच्या प्रश्नांसाठी सुरु असलेल्या आंदोलनांसाठी गुन्ह्यांवर गुन्हे दाखल होतायत. मात्र यामुळे राहुल गांधींसाठी नव्हे तर सरकारसाठी डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope: आज कोणाला मिळणार नशिबाची साथ? तुमच्या राशीचं भविष्य वाचा

Crime: सोशल मीडियावरून मैत्री, हॉटेलवर बोलावलं; मुलीसोबत भयंकर घडलं

झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना मातृशोक! भाजपचे दिग्गज नेते अंत्यदर्शनासाठी; राजकीय वर्तुळात शोककळा

दिल्लीच्या रस्त्यांवर प्रियंका गांधींचा 'रुद्रावतार', 'इंदिरा इज बॅक', सोशल मीडियावर नवा ट्रेंड

Palghar Earthquake: पालघर पुन्हा भूकंपाच्या धक्क्याने हादरले, नागरिकांची घराबाहेर धाव; परिसरात भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT