Rahul Gandhi Saam Tv
देश विदेश

Rahul Gandhi: 'चक्रव्यूहाचे भाषण झोंबले, माझ्यावर ईडी कारवाईची तयारी', राहुल गांधींचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'वाट पाहतोय..'

Rahul Gandhi ON ED Raid: राहुल गांधींच्या या भाषणानंतर सत्ताधाऱ्यांनीही जोरदार प्रत्यूत्तर दिले. अशातच आता माझ्यावर ईडी कारवाईची तयारी सुरू असल्याचा खळबळजनक दावा राहुल गांधी यांनी केला आहे.

Gangappa Pujari

दिल्ली, ता. २ ऑगस्ट २०२४

संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर तोफ डागली. महाभारतामधील चक्रव्यूहाचा दाखला देत त्यांनी देश सध्या सहा जणांच्या चक्रव्यूहात अडकल्याची टीका केली. राहुल गांधींच्या या भाषणानंतर सत्ताधाऱ्यांनीही जोरदार प्रत्यूत्तर दिले. अशातच आता माझ्यावर ईडी कारवाईची तयारी सुरू असल्याचा खळबळजनक दावा राहुल गांधी यांनी केला आहे.

काय म्हणालेत राहुल गांधी?

याबाबत सविस्तर माहिती अशी की, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी त्यांच्यावर ईडीकडून कारवाई होणार असून तशी तयारी सुरू असल्याचा मोठा दावा केला आहे. राहुल गांधी यांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. संसदेतील भाषण न आवडल्याने ईडी कारवाईत अडकवण्याचा प्लॅन असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

"दोघांपैकी एकाला माझे चक्रव्यूहचे भाषण आवडले नसल्याचे दिसत आहे.ईडीमधील काही अधिकाऱ्यांनी मला सांगितले की माझ्यावर कारवाई करण्याचा प्लॅन आखला जात आहे. मी सुद्धा हात पसरून वाट पाहत आहे," असे राहुल गांधी यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, संसदेमध्ये राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पावरुन मोदी सरकारवर जोरदार टीका केली. महाभारतामध्ये अभिमन्यूला चक्रव्यूहामध्ये घेरले होते. चक्रव्यूहालाच पद्यव्यूह असेही म्हटले जाते ज्याचा अर्थ कमळ असा होता. २१ व्या शतकातही कमळाच्या रुपाने एक चक्रव्यूह तयार झाले आहे, असा घणाघात त्यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT