Rahul Gandhi presents documents claiming 1 crore bogus voters in Maharashtra saam tv
देश विदेश

Bogus Voter Scam: राहुल गांधींकडून पुराव्यांसह बोगस मतदारांचा भांडाफोड; सांगितली नोंदणीची मोडस ऑपरेंडी

Rahul Gandhi Exposed Bogus Voter Scam: राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बनावट मतदार घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. यात १ कोटींहून अधिक बनावट मतदार नोंदणीकृत असल्याचा दावा त्यांनी केलाय.

Bharat Mohalkar

  • राहुल गांधी यांचा दावा – महाराष्ट्रात 1 कोटी बोगस मतदारांची नोंद.

  • त्यांनी यासाठी पुरावे सादर करत विशेष मोडस ऑपरेंडीचा खुलासा केला.

  • काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे चौकशीची मागणी.

  • मतदार यादीतील पारदर्शकतेवर मोठा प्रश्नचिन्ह.

राहुल गांधींनी पुराव्यांसह बोगस मतदारांचा भांडाफोड केल्याचा दावा केलाय. मात्र या बोगस मतदारांच्या नोंदणीची मोडस ऑपरेंडी कशी आहे? आणि खरंच महाराष्ट्रात 1 कोटी बोगस मतदार आढळले आहेत का? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. बनावट मतदान, बोगस पत्ते, एकाच पत्त्यावर अनेक मतदार असे महाराष्ट्रात 5 महिन्यात तब्बल 1 कोटी बोगस मतदार वाढल्याचे पुरावे दाखवून राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला थेट आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय. (Rahul Gandhi Claims 1 Crore Bogus Voters In Maharashtra With Proof)

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर बोगस मतदानाच्या शंकांना बळ मिळालं आणि तिथून काँग्रेस कार्यकर्त्यांनी बोगस मतदारांता पर्दाफाश केलाय. त्याची मोडस ऑपरेंडीच राहुल गांधींनी सादरीकरणात उलगडून सांगितलीय.

टेक राज सपकोटा 40 वर्षीय मतदार

टेक राज सपकोटाच्या वडिलांचं नाव DFOGADF

सपकोटाच्या घराचं नाव 0

मतदाराचा EPIC नंबर SVF8249344 आहे

फक्त टेक राज सपकोटाच नाही तर देशभरात हजारो बोगस मतदार असल्याचा दावा गांधींनी केलाय.

तर महाराष्ट्राच्या मतदारयादीत 40 लाख बोगस मतदार रहस्यमयरित्या घुसवण्यात आल्याचा दावा करत राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर प्रश्नांची सरबत्ती केलीय.

महाराष्ट्राच्या निवडणुकीत सायं. 5.30 नंतर अचानक लाखो मतदार कसे वाढले?

डेटाची मागणी करुनही इलेक्ट्रॉनिक डेटा का मिळत नाही?

3 वेळा डुप्लिकेट मतदान केलेले 11 हजार मतदार कुठून आले?

एकाच घराच्या पत्त्यावर 46 मतदार कसे?

राहुल गांधी फक्त प्रश्न विचारुनच थांबले नाहीत तर त्यांनी निवडणूक आयोगाने डेटा डिलीट का केला? असा सवाल उपस्थित केलाय. राहुल गांधींनी आयोगाच्या एकूणच कार्यपध्दतीची चिरफाड केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांधींवर पलटवार केलाय. महाराष्ट्र, कर्नाटक, हरियाणा या राज्यातील बोगस मतदारांची माहिती सादर करत राहुल गांधींनी निवडणूक आयोगाची कोंडी केलीय.. त्यामुळे राहुल गांधींनी पुराव्यासह केलेल्या आरोपांना निवडणूक आयोग उत्तर देणार की तोंडावर बोट ठेऊन विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या आरोपांकडे दुर्लक्ष करणार? याकडे देशाचं लक्ष लागलंय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT