राहुल गांधी पंजाबच्या पूरग्रस्त भागांना भेट देण्यासाठी रवाना झाले होते.
गुरदासपूर जिल्ह्यात तूर गावात जाताना पोलिसांनी त्यांना अडवलं.
राहुल गांधींनी पोलिस अधिकाऱ्यांशी तीव्र वाद घातला.
काँग्रेस नेत्यांनी आप सरकारवर राजकारण केल्याचा गंभीर आरोप केला.
सोशल मीडियावर राहुल गांधींचा व्हिडिओ व्हायरल झाला.
Rahul Gandhi Punjab flood victims visit controversy : काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पंजाबमध्ये पोलिसांनी रोखलं. गुरदासपूर जिल्ह्यातील तूर गावात राहुल गांधी पूरग्रस्त भागाला भेट देण्यासाठी निघाले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अडवले. सुरक्षेचं कारण सांगत आप सरकारवर राजकारण केल्याचा आरोप काँग्रेसने केला. सोमवारी (15 सप्टेंबर) राहुल गांधी पंजाब दौऱ्यावर असताना त्यांना गुरदासपूर जिल्ह्यातील रावी नदीच्या पलीकडील तूर गावात जाण्यापासून रोखण्यात आले. राहुल गांधी अमृतसर आणि गुरदासपूर जिल्ह्यांतील पूरग्रस्त भागांचा दौरा करत होते. त्यांनी अमृतसरमधील घोनवाल आणि गुरदासपूरमधील गुरचक गावांना भेट देऊन पूरग्रस्तांशी भेट घेतली. पण तूर गावात जाण्याचा प्रयत्न करताना पोलिसांनी त्यांना अडवले. त्यावेळी राहुल गांधी यांचा पोलिसांसोबत तीव्र वादविवाद झाला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
राहुल गांधी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची -
राहुल गांधींना पोलिसांनी अडवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आलाय. राहुल गांधी पोलिस अधिकाऱ्यांना प्रश्न विचारताना दिसत आहेत. राहुल गांधी म्हणाले, "भारतात तुम्ही मला सुरक्षित ठेवू शकत नाही, असं तुम्हाला असं म्हणायचं आहे का?" यावर पोलिस अधिकाऱ्याने उत्तर दिले, "आम्ही नेहमी तुमच्या सुरक्षेसाठी तयार आहोत." याला प्रत्युत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, "मग तुम्ही का म्हणत आहात की हा भारताचा भाग आहे आणि तुम्ही मला तिथे सुरक्षित ठेवू शकत नाही? तो भारत नाही का?" या वेळी त्यांच्यासोबत पंजाब काँग्रेस अध्यक्ष अमरिंदर सिंह, राजा वडिंग आणि खासदार सुखजिंदर रंधावा देखील उपस्थित होते.
पाहा व्हिडिओ
काँग्रेस नेत्यांचे गंभीर आरोप -
राहुल गांधी यांना पोलिसांनी अडवल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी आप सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. पंजाब काँग्रेस अध्यक्ष राजा वडिंग म्हणाले की, राहुल गांधी फक्त लोकांना भेटून त्यांच्या समस्या ऐकण्यासाठी आले होते. परंतु पोलिसांनी सुरक्षेचे कारण सांगून त्यांना रोखले. जर राहुल गांधींना भारतात पाकिस्तानपासून धोका आहे आणि इथेही ते सुरक्षित नाहीत, तर ते नक्की कुठे सुरक्षित राहतील?
माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनीही पंजाब सरकारवर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, गेल्या तीन दिवसांपासून काँग्रेस कार्यकर्ते तिथे वैद्यकीय शिबिरे चालवत आहेत. तरीही राहुल गांधींना पूरग्रस्त कुटुंबांना भेटण्याची परवानगी देण्यात आली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.