Rahul Gandhi and Priyanka Gandhi Saam Tv
देश विदेश

Wayanad By-Election: वायनाडकडे दोन खासदार असणार, प्रियांकासाठी मते मागताना राहुल गांधी झाले भावुक

Rahul Gandhi: वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी प्रियांका गांधी यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राहुल गांधी भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.

Satish Kengar

केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, आई सोनिया भाई आणि राहुल गांधी उपस्थित होते.

याआधी वायनाड लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवत असलेल्या प्रियंका गांधी यांच्या प्रचारात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही सहभाग घेतला. वायनाडमध्ये प्रचार करताना ते म्हणाले की, येथून तुमचे लोकसभेत दोन खासदार असतील. एक अधिकृतपणे प्रियंका गांधी असणार आणि दुसरा मीही तुमचा खासदार आहे.

प्रियंका यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधी म्हणाले की, मी अजूनही तुमचा खासदार आहे. राहुल गांधी यांनी 2024 ची सार्वत्रिक निवडणूक वायनाड आणि रायबरेलीमधून लढवली होती. दोन्ही जागांवर ते विजयी झाले होते. मात्र निकाल आल्यानंतर त्यांनी वायनाडमधून आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला होता.

राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतरच काँग्रेसने त्यांच्या जागी प्रियंका गांधी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. प्रियांका गांधी यांची ही पहिलीच लोकसभा निवडणूक असेल. राहुल गांधी वायनाडमध्ये म्हणाले, ''मला वाटतं तुम्ही हे नातं चांगल्या प्रकारे समजू शकता. वायनाडच्या लोकांशी माझे विशेष नाते आहे. वायनाडने माझ्यासाठी जे केले ते शब्दात मांडता येणार नाही. जेव्हा भावना खूप जास्त असतात तेव्हा त्या काही कृतीतूनच व्यक्त होऊ शकतात.''

राहुल गांधी म्हणाले, ''मला तुम्हाला आठवण करून द्यायची आहे की, वायनाड ही देशातील एकमेव जागा असेल जिथे दोन खासदार असतील. एक अधिकृत आणि एक अशासकीय. तुमचे दोन्ही खासदार तुमचे हित जपण्याचे काम करतील.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: जो राधाकृष्ण विखे पाटील यांची गाडी फोडेल त्याला एक लाख रुपये बक्षीस, बच्चू कडूंची घोषणा|VIDEO

Ladki Bahin Yojana eKYC Date: लाडकी बहीणींना eKYC कधीपर्यंत करता येईल?

Hair Growth Tips: केस गळणे ३० दिवसात थांबवा, ट्राय करा न्यूट्रिशनिस्टने सांगितलेले 'हे' हेल्दी फूड

Maharashtra Live News Update : प्रकाश आंबेडकर महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण कुटुंबीयांच्या सांत्वन पर भेटीला

शिंदे सेनेकडून ठाकरे गट अन् राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यांनी हाती धरलं धनुष्यबाण

SCROLL FOR NEXT