Rahul Gandhi Viral Photo Saam TV
देश विदेश

माँ, तेरे कदमों में जन्नत है! भर रस्त्यात राहुल गांधींनी सोनिया गांधींच्या बुटाची बांधली लेस

दोन दिवसांपुर्वीच भर पावसामध्ये राहुल गांधी भाषण करतानाचा फोटो व्हायरल झाला होता. अशातच आता आणखी एका फोटोने राहुल गांधी यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

Jagdish Patil

Bharat Jodo Yatra: काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देशभर काँग्रेस मजबूत करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यांच्या या यात्रेला नागरिकांचा देखील मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. शिवाय राहुल यांच्या या भारत जोडो यात्रेने सोशल मीडियावर तर धुमाकुळ घातला आहे. (Bharat Jodo Yatra)

दोन दिवसांपुर्वीच भर पावसामध्ये राहुल गांधी भाषण करतानाचा फोटो व्हायरल झाला होता. अशातच आता आणखी एका फोटोने राहुल गांधी यांची सोशल मीडियावर (Social Media) जोरदार चर्चा आहे. या फोटोमध्ये राहुल गांधी आपल्या मातोश्री सोनिया गांधी यांच्या बुटाची लेस बांधताना दिसत आहेत. राहुल यांच्या या कृतीमुळे सर्वच स्थरातून त्यांचं कौतुक केलं जातं आहे.

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या कर्नाटकात (Karnatak) आहे. या यात्रेत आता सोनिया गांधी यांची एन्ट्री झाली असून मांड्या जिल्ह्यातील डाक बंगला परिसरातून सोनिया गांधी यांनी राहुल गांधी यांच्यासोबत पदयात्रेला सुरुवात केली.

यावेळी राहुल यांनी मोठ्या उत्साहाने सोनिया गांधींचे (Soniya Gandhi) स्वागत केलं. यात्रेत उपस्थित महिला नेत्यांनी सोनिया गांधींचा हात मिळवून अभिवादन देखील केलं. दरम्यानस सोनिया या यात्रेमध्ये १५ मिनिटं चालल्या त्यानंतर त्यांनी वेळ विश्रांती घेतली आणि त्या पुन्हा पदयात्रेत सहभागी झाल्या.

याच दरम्यान सोनिया यांच्या बुटाची लेस सुटल्याचं राहुल यांना दिसताच त्यांनी भर रस्त्यात खाली बसून त्यांनी सोनियांच्या बुटाची लेस बांधली. यावेळी त्यांचा एक फोटो कार्यकर्त्यांनी काढला आणि तो सध्या व्हायरल होत आहे.

शिवाय हा फोटो काँग्रेसने आपल्या ट्विटरवर (Tweet) टाकला आहे त्याला कॅप्शन फक्त 'माँ' असं दिलं आहे. हा फोटो ट्विटरवर शेअर करताच संपुर्ण देशभरात तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून हे ट्विट 3867 लोकांनी रिट्विट केलं आहे. तर जवळपास २४ हजार लोकांनी लाईक केलं आहे. त्यामुळे सामान्य कार्यकर्ता असो वा एखाद्या पक्षाचा मोठा नेता आपल्या आईप्रती सर्वांनाच प्रेम असतं हेच या फोटोमुळे पुन्हा सिद्ध झालं असल्याच्या कमेंट या फोटोखाली लोकं करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांच्या सांगली जिल्ह्यात चार जाहीर सभा

Pune : पुण्यात पहाटे ३ वाजेपर्यंत रंगली पार्टी! पबवर पुणे पोलिसांची छापेमारी; ८० ते १०० तरुण-तरुणी ताब्यात

EPFO Rules Change: EPFOने बदलले पीएफचे नियम; क्लेम, विड्रॉल आणि नॉमिनीच्या ८ महत्त्वाच्या नियमात बदल

SIR 2026 Fraud : SIR फॉर्ममध्ये चूक झाल्याचे सांगत ज्येष्ठ नागरिकाला सायबर चोरट्यांचा गंडा; ४ लाख ४३ हजार रुपये लंपास

Gingee Fort : जिंजी किल्ला फिरायला गेलाय? मग जवळच असलेली 'ही' ऐतिहासिक ठिकाणे पाहायला विसरू नका

SCROLL FOR NEXT