Raghav Chadha faces political setback as AAP removes him from Rajya Sabha deputy leadership role. Saam Tv
देश विदेश

राघव चड्ढांची आपनेच केली बोलती बंद! राज्यसभेतलं पदही काढून घेतलं; दिल्लीच्या राजकारणात खळबळ

Raghav Chadha: आम आदमी पक्षाने राघव चड्ढा यांना राज्यसभेतील उपनेतेपदावरून हटवले. या निर्णयामुळे दिल्लीच्या राजकारणात खळबळ उडाली असून पक्षातील अंतर्गत मतभेदांवर चर्चा सुरू झाली आहे.

Omkar Sonawane

आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघड चड्ढा यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू होती. एकीकडे राघव चड्ढा यांची लोकप्रियता वाढत असतानाच आता त्यांच्या पक्षाने त्यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. तसेच त्यांना पक्षाच्या राज्यसभेच्या उपनेतेपदावरून उचलबांगडी केली आहे. आम आदमी पक्षाने या संदर्भात राज्यसभा सचिवालयाला पत्र लिहिले असून राघव चड्ढा यांच्या जागी अशोक मित्तल यांची राज्यसभेतील उपनेते म्हणून नियुक्ती केली आहे.

सूत्रांनी दिलेल्या दिलेल्या माहितीनुसार, राघव चड्ढा यांना राज्यसभेत बोलण्यासाठी अधिक वेळ देऊ नये, अशी विनंतीही आम आदमी पक्षाने या पत्राच्या माध्यमातून केली आहे. गेल्या काही दिवसांपासून राघव चड्ढा हे लोकहिताच्या मुद्यावरून राज्यसभेमध्ये बोलत होते. विमानतळावर महागड्या दरात मिळणाऱ्या चहापासून ते डिलिव्हरी बॉइजचे प्रश्न तसेच मोबाईल रीचार्जमध्ये लोकांची कशी फसवणूक होती असे अनेक मुद्दे त्यांनी सभागृहात उपस्थित केले होते. त्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढली होती. अशा परिस्थितीत राघव चड्ढा यांच्यावर पक्षाकडून कारवाई झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

मात्र राघव चड्ढा यांच्यावर कारवाई का करण्यात आली याचे कारण आम आदमी पक्षाने दिलेले नाही. मात्र ही कारवाई शिस्तभंग आणि पक्षशिस्तीचे पालन न केल्यामुळे करण्यात आली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसेच अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदीया यांची निर्दोष मुक्तता झाल्यानंतरही राघव चड्ढा यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नव्हती. यामुळे वेगवेगळ्या चर्चा सुरू झाली होती. अशातच आज झालेल्या घडामोडींमुळे दिल्लीमध्ये तर्क वितर्क लावले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Parenting Tips : मुलांना ओरडल्यानंतर पालकांनी चुकूनही करू नका 'ही' चूक, विश्वासाचं नातं एका क्षणात तुटेल

Pune : पुण्यात पोलिसांनीच केले पोलिसांचे 'स्टिंग ऑपरेशन'! डमी डिलिव्हरी बॉय बनवून केला मोठा पर्दाफाश

Actor Home Fraud: मराठमोळ्या अभिनेत्याची २५ लाखांची फसवणूक; न्यायासाठी वर्षभरापासून करतोय धावपळ

Shocking : पनवेल हादरलं! तरुणाने अल्पवयीन मुलीला सार्वजनिक शौचालयात नेले, लैंगिक अत्याचार केले अन्...

SCROLL FOR NEXT