Uddhav Thackeray Saam Tv
देश विदेश

ठाकरे-पवारांचा पक्ष फोडला, तोच वॉशिंग मशिनचा खेळ पंजाबमध्ये; मुख्यमंत्री मान भाजपवर संतापले

Raghav Chadha AAP exit and BJP joining speculation : राघव चड्ढा यांच्यासह ७ राज्यसभा खासदार भाजपमध्ये जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने आप पक्षात मोठी खळबळ उडाली आहे.

Namdeo Kumbhar

Raghav Chadha latest news : खासदार राघव चड्ढा आणि ७ खासदारांच्या या बंडामुळे देशाच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. केजरीवाल यांच्या आप पक्षात पंजाब आणि दिल्लीत मोठी उलथापालथ झाली आहे. चड्ढा यांच्यासह ७ खासदार भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. यावर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी भाजपवर टीका केली असून थेट महाराष्ट्रासोबत कनेक्शन जोडलेय. शरद पवार यांचा पक्ष, उद्धव ठाकरे यांचा पक्ष आणि काँग्रेस पक्ष फोडला. तोच वॉशिंग मशिनचा खेळ भाजपने पंजाबमध्ये केला असा आरोप मान यांनी भाजपवर केला.

महाराष्ट्रात शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्ष फोडण्याचे काम भाजपने केले. तोच 'वॉशिंग मशिन'चा खेळ आता पंजाबमध्ये सुरू केला असा जोरदार आरोप पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केला आहे. दिल्लीत आयोजित एका विशेष पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलताना भगवंत मान यांनी भाजपवर अत्यंत तिखट शब्दांत प्रहार केला. बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना त्रास देत आहेत. त्यांच्या हातात फक्त ईडी आणि सीबीआय आहे, असेही ते म्हणाले.

आम आदमी पार्टीचे (AAP) खासदार राघव चड्ढा यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. इतकेच नव्हे तर, राज्यसभेतील 'आप'च्या १० पैकी ७ खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. यावर भाजपने पंजाबच्या जनतेचा विश्वासघात केला आहे. पंजाबच्या मातीत भाजपला कोणताही स्थान (आधार) उरलेले नाही," असे मान म्हणाले.

महाराष्ट्रातील पक्षफोडीचा संदर्भ देत मान म्हणाले की, भाजपने लोकशाहीचा गळा आवळण्याचे काम केले आहे आणि आता हेच संकट पंजाबवर ओढवले आहे. दरम्यान, राघव चड्ढा यांनी आप सोडण्याचा निर्णय जाहीर केला असून आपचे राज्यसभेतील १० पैकी ७ खासदार भाजपमध्ये सामील होणार आहेत. यामध्ये हरभजन सिंह यांचाही समावेश आहे. "पंजाबची प्रतिमा मलीन करण्याचा हा भाजपचा प्रयत्न आहे. भाजपने पंजाबच्या जनतेचा विश्वासघात केला असून राज्यातील चांगली कामे थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपचे स्वतःचे असे काहीही नाही. पंजाबमध्ये त्याला कोणताही चेहरा नाही, असे मान म्हणाले."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Clock Placement Tips: घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे? वास्तूनुसार ‘या’ ३ चुका टाळा

Sukanya Samriddhi Yojana: ₹1.5 लाख गुंतवा अन् ₹71.82 लाख मिळवा! जाणून घ्या कन्या सुकन्या समृद्धी योजनेचे गणित

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Nitin Gadkari : नितीन गडकरी राजकारणातून निवृत्त होणार का? कालच्या त्या वक्तव्यावर थेट ऑफिसमधून स्पष्टीकरण

पूर्ण फी भरली, तरी प्रशिक्षण नाही! VLCC विरोधात मनसेचा धडक मोर्चा

SCROLL FOR NEXT