pushkar singh dhami Saam Tv
देश विदेश

निवडणूक हरलेले पुष्कर सिंह धामी पुन्हा उत्तराखंडचे मुख्यमंत्री

आज भाजपच्या बैठकीत धामी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

साम वृत्तसंथा

उत्तराखंडमध्ये भाजपचे (BJP) पुष्कर सिंह धामी नवे मुख्यमंत्री होणार आहेत. आज भाजपच्या बैठकीत धामी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. धामी राज्यपाल यांची भेट घेण्यासाठी गेले आहेत. ते आज सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnathsingh), केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी आणि राज्य निवडणूक प्रभारी प्रल्हाद जोशी यांना विधीमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी निरीक्षक म्हणून पाठवण्यात आले होते. आज सायंकाळी 5 वाजता ही बैठक झाली. उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवला. पण मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचा खटीमा मतदार संघातून पराभव झाला होता.

उत्तराखंडमध्ये भाजपने (BJP) पुष्कर धामी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक (Election) लढवली आणि 47 जागा जिंकल्या. त्यामुळे भाजप पुन्हा सत्तेत येणार हे निश्चित होते. पण धामी स्वतः निवडणूक हरले होते. मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारांमध्ये धामी हे प्रबळ दावेदार मानले जात होते.

धोमी यांच्या शिवाय आमदार सतपाल महाराज, श्रीनगरचे आमदार धनसिंग रावत, राज्यसभा खासदार अनिल बलुनी, माजी मुख्यमंत्री रमेश पोखरियाल निशंक आणि केंद्रीय मंत्री अजय भट्ट हे नेतेही मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते. उत्तराखंडमधील (Uttarakhand) विधानसभा निवडणुकीत भाजपच्या (BJP) विजयामागे धामी यांची भूमिका महत्वाची मानली जाते.यायाच फायदा त्यांना झाला असल्याचे बोलले जात आहे.

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाचा पुन्हा आराखडा बदलला, लांबी वाढली; शेतकऱ्यांचा विरोध शमला

Maharashtra News Live Update: शिवराज मोटेगावकरला ९ दिवसांची CBI कोठडी

Paneer and Moong Chilla Recipe: प्रोटीनने भरपूर हेल्दी आणि टेस्टी नाश्त्यासाठी झटपट बनवा पनीर-मूग चीला

Mirchi Pakora Recipe : स्ट्रीट स्टाइल कुरकुरीत मिरचीचे भजी कसं बनवाल? वाचा ५ मिनिटांत होणारी रेसिपी

Accident: लग्नाच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १०० जणांना घेऊन जाणाऱ्या ट्रकला कंटेनरची धडक; ४ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT