Punjab DSP Heart Attack Saam TV
देश विदेश

Shocking News: जिममध्ये व्यायाम करताना पोलीस अधिकाऱ्याला हृदयविकाराचा झटका; काही सेकंदातच मृत्यूने गाठलं

Punjab DSP Heart Attack: जिममध्ये व्यायाम करत असताना एका पोलीस अधिकाऱ्याचा हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक हरियाणाच्या चंदीगडमध्ये घडली.

Satish Daud

Punjab DSP Died In Heart Attack

जिममध्ये व्यायाम करत असताना एका पोलीस अधिकाऱ्याचा हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक हरियाणाच्या चंदीगडमध्ये घडली. दिलप्रीतसिंग (वय 50) असं मृत पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. दिलप्रीत हे पंजाब पोलीस दलातील डीजीपी पदावर कार्यरत होते. त्यांच्या निधनाने मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, डीएसपी दिलप्रीत सिंग पंजाबच्या मालेरकोटला येथील पोलीस ठाण्यात कार्यरत होते. मात्र, शेतकरी आंदोलनामुळे सध्या त्यांची ड्युटी खनौरी सीमेवर होती. गुरुवारी (२२ फेब्रुवारी) रात्री ८ ते शुक्रवारी पहाटे ४ वाजेपर्यंत त्यांनी ड्युटी केली. (Latest Marathi News)

दरम्यान, शिफ्ट संपल्यानंतर दिलपीत सिंग हे लुधियाना-फिरोजपूर रोडवरील भाई बाला चौकाजवळ असलेल्या एका जिममध्ये व्यायाम करण्यासाठी गेले होते. जिममध्ये कसरत करत असताना दिलप्रीत सिंग यांच्या अचानक छातीत दुखू (Heart Attack) लागले. त्यामुळे ते काही क्षणातच ते जमिनीवर कोसळले.

जिममधील कर्मचाऱ्यांनी दिलप्रीत सिंग यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना यांना तपासून मृत घोषित केले. दिलप्रीत सिंग हे एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी होते. याआधी त्यांनी लुधियानामध्ये पोलीस एसपी म्हणून काम केले होते.

त्याच्या सहकाऱ्यांच्या माहितीनुसार, दिलप्रीत त्यांच्या तब्येतीबाबत खूपच जागरूक होते. ते दररोज नियमित जिमला जायचे. दिलप्रीत हे राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू देखील होते. 1992 मध्ये सहाय्यक उपनिरीक्षक (ASI) म्हणून ते पंजाब पोलीस दलात रुजू झाले होते. त्यांनी विविध पोलीस ठाण्यात सेवा बजावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

Shadashtak Yog 2026 : ९ ऑक्टोबरपासून धोकादायक योग! ४ राशींवर कोसळणार अडचणींचा डोंगर; तुमची रास तर नाही ना?

जगात पुन्हा लॉकडाऊन लागणार? रशियात लॅबमध्ये 'ती' एक चूक झाली अन् एकाचा मृत्यू; २०० जण क्वारंटाईन

Shreyas Iyer: ‘योग्य वेळ आली की तो राज्य करेल’, वैभव सूर्यवंशीच्या भवितव्याबाबत श्रेयस अय्यरचा मोठा विश्वास

SCROLL FOR NEXT