Howrah mail coach  social Media
देश विदेश

Howrah mail coach : हावडा मेल ट्रेनमध्ये स्फोट; प्रवाशांमध्ये एकच खळबळ, ४ जण जखमी

Howrah mail coach Blast : हावडा मेल ट्रेनमध्ये स्फोट झाल्याची घटना घडली. फटाक्यांमुळे स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

Vishal Gangurde

पंजाब : पंजाबच्या सरहिंद रेल्वे स्टेशनजवळ हावडा मेलच्या जनरल कोचमध्ये स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत चार जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना शनिवारी रात्री १०.३० वाजता ट्रेनमध्ये स्फोट झाल्याची घटना घडली. फटाक्यांनी भरलेला प्लास्टिकच्या बादलीत स्फोट झाल्याची घटना घडली. या घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांना सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. स्फोटानंतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून नमुने घेऊन फॉरेन्सिक लॅबला पाठवले आहेत.

स्फोटानंतर परिसरात एकच खळबळ

शनिवारी रात्री हावडा मेल कोचमध्ये अचानक स्फोट झाला. या स्फोटानंतर ट्रेनमध्ये एकच खळबळ उडाली. रेल्वे पोलिसांनी सांगितलं की, 'प्लास्टिकच्या बादलीत फटाक्यांचा स्फोट झाला. या स्फोटात चार जण जखमी झाले. एका महिलेसहित चार प्रवासी जखमी झाले. जखमी प्रवाशांना सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जीआरपी डीएसपी जगमोहन सिंह यांच्या माहितीनुसार, अजय कुमार आणि त्यांची पत्नी संगिता कुमारी, आशुतोष पाल, सोनू कुमार यांच्या नावाचा समावेश आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

रेल्वेच्या सूचनांकडे प्रवाशांचे दुर्लक्ष

फतेहगड सिव्हिल रुग्णालयातील डॉक्टरांचं म्हणणं आहे की, 'सर्व जखमी प्रवासी धोक्यातून बाहेर आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. रेल्वेने सूचना दिल्यानंतरही धोकादायक वस्तू घेऊन प्रवास करतात.

रेल्वेने जारी केले निर्देश

दिवाळीच्या औचित्यावर सुरक्षेचा विचार करून रेल्वेने काही वस्तू नेण्यास बंदी घातली आहे. फटाके,अॅसिड, चमडं, पॅकेजमधील तेल, ग्रीस सारख्या वस्तूंना ट्रेनमध्ये घेऊन जाण्यास बंदी आहे. या वस्तू घेऊन जाताना दिसल्यास कलम १६४ अंतर्गत प्रवाशांना १००० रुपये दंड किंवा तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT