sonu sood Punjab Election 2022 saam tv
देश विदेश

Punjab Election 2022: वातावरणं तापलं, साेनू सूदची कार जप्त; घराबाहेर न पडण्याचा पाेलिसांचा आदेश

आज पंजाब विधानसभेसाठी मतदान सुरु आहे.

साम न्यूज नेटवर्क

पंजाब : पंजाबमधील (punjab) ११७ जागांसाठी आज (punjab election polling day) मतदान हाेत आहे. निवडणुक आयोगाने बहुतांश ठिकाणी कडक कारवाई करीत नेत्यांसह अभिनेत्यास कायद्याचा धाक दाखविल्याची घटना घडल्या आहेत. अभिनेते सोनू सूद (sonu sood) यांना मेगा येथील लांडे गावात जात असताना निवडणूक निरीक्षकांनी अडवले. निरीक्षकाने साेनूची गाडी जप्त केली आणि त्याला दुसऱ्या वाहनातून घरी पाठवले आणि त्याला घरीच थांबण्याची सूचना केली. या कारवाईमुळे उर्वरित उमेदवारांमध्ये खळबळ उडाली आहे. (sonu sood latest marathi news)

पंजाब निवडणुकीत (punjab elections) मतदानादिवशी सोनू सूद मतदारांवर (voter) प्रभाव टाकत असल्याची तक्रार अकाली दलाचे पोलिंग एजंट दीदार सिंग यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. यानंतर निवडणूक आयोगाच्या पथकाने सोनू सूदवर लक्ष ठेवण्यास प्रारंभ केला. एका ठिकाणी अकाली दलाच्या आरोपांमध्ये तथ्य आढळल्याने साेनू याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

Actor Sonu Sood

या प्रकरणावरुन सोनू सूदने त्याची बाजू मांडत त्याच्यावर लावण्यात आलेले आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत. त्याने कोणत्याही प्रकारे मतदारांवर प्रभाव टाकला नाही. मी फक्त माझ्या समर्थकांकडून अहवाल घेत होतो असे म्हटलं आहे.

चित्रपट अभिनेता सोनू सूदची जप्त केलेली कार मोगा पोलीस ठाण्यात उभी करण्यात आली आहे.

उपायुक्त हरीश नायर म्हणाले संपूर्ण प्रकरणाचा अहवाल एसएसपींकडून मागवण्यात आला आहे. आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल असे नमूद केले. दरम्यान आज सकाळपासून साेनू सूद आणि त्यांची बहीण मालविका सूद प्रत्येक बूथवर मतदारांच्या भेटी घेत होते. मालविका माेगा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. या जागेवर मालविका यांची भाजप उमेदवार हरजत कमल यांच्याशी थेट लढत आहे.

दरम्यान विरोधकांकडून, विशेषत: अकाली दलाच्या लोकांकडून विविध बूथवर धमक्या आल्याची माहिती आम्हाला मिळाली. काही बूथवर पैसे वाटले जात आहेत. त्यामुळे तपास करणे आणि निष्पक्ष निवडणुका सुनिश्चित करणे हे आपले कर्तव्य आहे. म्हणूनच आम्ही बाहेर पडलो होतो. आता, आम्ही घरी आहोत असे सोनू सूदने नमूद केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT