सरपंच हरजिंदर सिंह हॅप्पी यांची गोळ्या झाडून हत्या
हल्लेखोरांनी जवळपास १५ गोळ्या झाडल्या.
सरपंच जिमला जात असताना झाला हल्ला
पंजाबच्या मोगामध्ये बाघापुरानामध्ये सरपंच हरजिंदर सिंह हॅप्पी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. कारने आलेल्या हल्लेखोरांनी अनेक राऊंड गोळ्या झाडून हत्या केली. सरपंचाची हत्या झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सरपंचाला हत्येआधी जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. सरपंचाकडे बुलेटप्रुफ गाडी होती. पण आज सरपंचाने जीमला जाताना थार गाडी आणली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, सरपंच हरजिंदर सिंह हॅप्पी हे जिमला चालले होते. त्यावेळी कारमधून हल्लेखोर आले. त्यांनी जवळपास १५ गोळ्या झाडल्या. त्यातील ७ ते ८ गोळ्या सरपंचाला लागल्या. पूर्ववैमनस्यातून गोळीबार हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस दोन संशयित आरोपीच्या मागावर आहे. त्यांना लवकरच अटक केली जाणार पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
दिवसाढवळ्या सरपंचाची हत्या झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी लवकरच दोन आरोपींना पकडणार असल्याचा दावा केला आहे. घटनास्थळाच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी सुरू केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सरपंचावर 10 हून अधिक राऊंड गोळीबार करण्यात आला. मोगाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी अजय गांधी यांच्यासहित इतर पोलीस कर्मचारी देखील घटनास्थळी पोहोचले आहेत.
सरपंचाची हत्या झाल्यानंतर गावात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. सरपंचाच्या नातेवाईकांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.