Punjab Accident Saam Tv
देश विदेश

Punjab Accident: भरधाव जाणाऱ्या बसची पुलाच्या लोखंडी अँगलला धडक; ८ प्रवाशांचा मृत्यू

Punjab Accident: पंजाबमधील मुक्तसार साहिब जिल्ह्यात बस कालव्यात कोसळून आज भीषण अपघात झाला. या अपघातात ८ जणांचा मृत्यू झालाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Punjab Bus Accident:

पंजाबमधील श्री मुक्तसार साहिब आणि वारिग गावादरम्यान प्रवासी बस कालव्यात कोसळली. या अपघात ८ प्रवाशांचा मृत्यू झाला. चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं बसचा अपघात झाला आहे. अपघातग्रस्त झालेली बस श्री मुक्तसार साहिबहून निघाली होती. बस कालव्यात कोसळल्यानंतर स्थानिक नागरिकांनी प्रवाशांना पाण्यात बाहेर काढलं. बसचा अपघात झाल्यानंतर बस चालक आणि कंडक्टर घटनास्थळावरून पळून गेले. (Latest News )

ईटीव्ही भारत या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, अपघातग्रस्त बसचा भरधाव वेगानं येत होती. कालव्यावरील पुला जवळ आल्यानंतर बस चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यानंतर बस लोखंडी अँगलला धडकली. बसची धडक इतकी जोरात होती की लोखंडी अँगल तोडत बस थेट कालव्यात कोसळली. बसचा अर्धा भागत पाण्यात बुडाला तर अर्धा भाग पुलावर होता. दरम्यान अपघाताची माहिती होताच स्थानिक लोक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमी प्रवाशांना जवळील रुग्णालयात दाखल केलं.

त्यानंतर पोलिसांना अपघाताची माहिती देण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार, ८ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळालीय. दरम्यान काही वर्षापूर्वी याच पुलावर पंजाब रोडवेज श्री मुक्तसार साहिबची बसचा अपघात झाला होता. त्यावेळी लहान मुलांसह ८० प्रवाशांचा मृत्यू झाला होता. दरम्यान मुख्यमंत्री मान यांनी अपघात झाल्यानंतर एक्सवर पोस्ट दु:ख व्यक्त केलंय.

घटनास्थळी प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून मदत कार्य करत आहेत. तसेच घटनेची माहिती मिळाल्यानंतर पंजाब सरकारमधील मंत्री गुरमीत सिंग खुडियान आणि आमदार काका ब्रार हे घटनास्थळी पोहोचले. जखमींची त्यांनी भेट घेतली असून त्याच्यावर योग्य उपचार करावीत अशा सूचना त्यांनी डॉक्टरांनी दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Credit Card : आरबीआयचा क्रेडिटधारकांना मोठा झटका; ही सुविधा झाली बंद, काय आहेत नवीन गाईडलाइन?

Solar Eclipse: सूर्यग्रहणाच्या वेळी कोणत्या चुका करु नये?

Maharashtra Live News Update: पुण्यात पावसाचा कहर, बंगळूर-पुणे विमान मुंबईच्या दिशेने वळवले

Pune Crime: साईड नाही दिली, भररस्त्यावर घायवळ गँगच्या लोकांनी घातली गोळी

Hair Care Tips: बदलत्या हवामानामध्ये 'या' चुका टाळा, अन्यथा तुमचे केस गळणे कधीच थांबणार नाही

SCROLL FOR NEXT