Malad Tourism: लांब ट्रॅव्हलचा कंटाळा आला? 31st साठी मालाडच्या मनोरीतच मिळेल परफेक्ट न्यू इअर फील

Surabhi Jayashree Jagdish

मनोरी

थंडीच्या दिवसात आणि ३१ डिसेंबरला मालाडजवळील मनोरी परिसर हा गजबजाटापासून थोडा दूर, शांत आणि निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. समुद्र, हिरवळ, गावातील वातावरण आणि खाण्याची ठिकाणं यामुळे इथे गर्दी कमी असते.

फिरण्याची ठिकाणं

तुम्हीही जर नवीन वर्ष किंवा ३१ st डिसेंबरचा प्लान करत असाल तर तर मनोरीजवळील ही ठिकाणं नक्कीच योग्य ठरतात. पाहूयात तुम्ही कुठे-कुठ फिरू शकता

मनोरी बीच

मनोरी बीचचा मुख्य भाग टाळून थोडा आतला शांत किनारा निवडल्यास गर्दी कमी मिळते. हिवाळ्यात समुद्रकिनाऱ्याची हवा थंड आणि आल्हाददायक असते. संध्याकाळी सूर्यास्त पाहत निवांत बसण्यासाठी हा भाग छान आहे.

मनोरी गाव

मनोरी गावातून फेरफटका मारताना नारळाची झाडं, छोटी घरं आणि शांत रस्ते अनुभवता येतात. ३१ डिसेंबरला शहराच्या गोंगाटापासून दूर राहण्यासाठी हा परिसर योग्य आहे.

होमस्टे किंवा रिसॉर्ट परिसर

मनोरीजवळ काही छोटे होमस्टे आणि साधे रिसॉर्ट्स आहेत. इथे मोठ्या पार्टीऐवजी शांत संगीत आणि साधं जेवण मिळतं. कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत शांतपणे वेळ घालवण्यासाठी हे ठिकाण योग्य आहे.

खाडी किनारा

समुद्राऐवजी खाडीच्या बाजूला बसायला गेल्यास पूर्ण शांतता अनुभवता येते. हिवाळ्यात इथलं वातावरण थंड आणि प्रसन्न असतं. निसर्ग निरीक्षण, फोटो काढणं यासाठी हा भाग छान आहे.

सेंट जेरोम चर्च परिसर

मनोरीतील हे जुने चर्च शांत आणि स्वच्छ परिसरात आहे. ३१ डिसेंबरला याठिकाणी धार्मिक आणि शांत वातावरण असतं. गर्दी नको असणाऱ्यांसाठी हा परिसर शांती देणारा आहे.

गावातील जेवणाची ठिकाणं

मनोरीत लहान स्थानिक हॉटेल्समध्ये ताजे मासे आणि साधं जेवण मिळतं. ३१ डिसेंबरला मोठ्या हॉटेलऐवजी इथली घरगुती चव वेगळा अनुभव देते.

Blouse Colors Slim Arms: ब्लाऊज घातल्यावर दंड जाड दिसतो? या रंगाचे ब्लाऊज वापरा, दंड दिसेल एकदम स्लिम

येथे क्लिक करा