Lucky Oberoi Death Saam Tv
देश विदेश

Lucky Oberoi Death: आप नेत्याच्या हत्येचा थरकाप उडवणारा VIDEO; बाइकवरून दोघे आले, धडाधड ५ गोळ्या झाडल्या अन्...

Aaap Leader Lucky Oberoi Killed CCTV Video: पंजाबमध्ये आपच्या नेत्याची गुरूद्वारासमोर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ५ गोळ्या शरीरात घुसल्याने गंभीर जखमी झालेल्या आप नेत्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.

Priya More

Summary -

  • पंजाबच्या जालंदरमध्ये आप नेते लक्की ओबेरॉय यांची गोळी झाडून हत्या

  • दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी पाच गोळ्या झाडल्या

  • ५ गोळ्या शरीरात घुसल्याने आप नेत्याचा जागीच मृत्यू

  • या घटनेचा थरकाप उडवणारा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे

पंजाबच्या जालंदरमध्ये आम आदमी पार्टीच्या बड्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या आप नेते लक्की ओबेरॉय यांचा मृत्यू झाला. मॉडल टाऊन येथील गुरूद्वारा साहिबासमोर ही घटना घडली. लक्की ओबेरॉय आझ सकाळी गुरूद्वारामध्ये दर्शनसाठी आले होते. त्याचवेळी त्याठिकाणी दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर धाडधाड करत ५ गोळ्या झाडल्या. ही गोळीबाराची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याचा थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

हल्लेखोरांनी आप नेते लक्की ओबेरॉय यांच्यावर धाडधाड गोळ्या झाडल्या. ५ गोळ्या शरीरात घुसल्याने ते गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. पण उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या घटनेनंतर जालिंदर शहरात भीतीचे वातावरण आहे. आप नेत्यावर हल्ला केल्यानंतर हल्लेखोर फरार झाले. सध्या पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला आहे. घटनास्थळ सील करण्यात आले आहे.

पोलिस अधिकारी हरिंदर सिंग गिल यांनी सांगितले की, प्राथमिक तपासातून असे दिसून येते की दोन संशयित घटनास्थळी आले होते आणि त्यापैकी एकाने आप नेत्यावर अनेक वेळा गोळ्या झाडल्या. हत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. फॉरेन्सिक टीम तपास करत आहे. पोलिस सीसीटीव्ही व्हिडीओद्वारे आरोपींचा शोध घेत आहेत.

लक्की ऑबेरॉय यांच्या पत्नीने आम आदमी पक्षाच्या तिकीटावर महापालिका निवडणूक लढवली होती. पण या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. लक्की ओबेरॉय हे कॅन्ट मतदारसंघाच्या प्रभारी राजविंदर कौर थियाडा यांच्या जवळचे असल्याचे सांगितले जात आहे. लक्की ओबेरॉय यांच्या हत्येनंतर पंजाबमध्ये कायदा सुव्यवस्थेवरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT