saam tv
देश विदेश

Tourists Stuck In Himachal Pradesh: पुण्यातील ११ पर्यटक हिमाचल प्रदेशात अडकले, संपर्क होत नसल्याने नातेवाईक चिंतेत

Pune Tourists Stuck In Flood Of Himachal Pradesh: उत्तर भारतात गेल्या काही दिवसांपासून पावसाने कहर केला आहे. या पावसात देशभरातील हजारो पर्यटक हिमाचलप्रदेशात अडकले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Pune 11 Tourists Stuck In Flood Of Himachal Pradesh: पुण्यातील ११ पर्यटक हिमाचल प्रदेशात पुरामध्ये अडकल्याची माहिती समोर येत आहे. या पर्यटकांशी संपर्क होत नसल्याने नातेवाईक चिंतेत आहेत. उत्तर भारतात पावसामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमध्ये हे पर्यटक अडकले असल्याशी शक्यता आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून हिमाचल सरकारशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे.

उत्तर भारतात गेल्या काही दिवसांपासून पावसाने कहर केला आहे. या पावसात देशभरातील हजारो पर्यटक हिमाचलप्रदेशात अडकले आहेत. त्यात पुण्यातील 11 जणांचा समावेश आहे. हे सर्व पर्यटक पिंपरी चिंचवड येथील असल्याची माहिती आहे. त्यांच्यााशी संपर्क होत नसल्याने नातेवाईक चिंतेत आहेत.

दरम्यान पुणे जिल्हा प्रशासनाकडून हिमाचल प्रदेश सरकारशी संपर्क साधण्यात येत आहे. तेथील वाहतूक बंद आहे, मात्र सर्व पर्यटक सुरक्षीत असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

हिमाचल प्रदेशात कुलू, मनाली, कसोल, मंडी अशी अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळं आहेत. या ठिकाणी दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून तेथे झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक पर्यटक अडकून पडले आहेत. वाहतूक आणि मार्ग बंद असल्याने ये-जा करणे अशक्य आहे. (Tajya Marathi Batmya)

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, 'पिंपरी चिंचवडमधील 5 पर्यटक मंडी येथे अडकले आहेत, दोन दिवस त्यांचा संपर्क झाला नव्हता. मंगळवारी तेथील परिस्थिती सुधारल्यावर त्यांनी जवळच्या पोलिस ठाण्यातून कुटुंबियांशी संपर्क साधला. ते सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Latest Political News)

जिल्हा प्रशासन हिमाचल सरकारच्या संपर्कात असून सर्व पर्यटक सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे नातेवाईकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव कारची टेम्पो अन् दुचाकीला धडक, एकाचा जागीच मृत्यू; अंगावर काटा आणणारा VIDEO समोर

Relationship Tips: सासूबाईंची आवडती सून होण्यासाठी करा 'या' ५ गोष्टी; सासरवाडीत व्हाल सर्वांच्या लाडक्या

Tuesday Horoscope: संपत्तीत वाढ होणार! ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

काँग्रेस नेत्यावर गोळीबार; 6-7 गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोलारांनी काढला पळ

Maharashtra News Live Update: शिवसेनेकडून आमदार बच्चू कडू यांच्याकडे मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT