Uttar Pradesh  Saam Tv
देश विदेश

Uttar Pradesh: पुजाने जिवाची बाजी लावून ५ जणांना वाचवलं; पण अखेरचा श्वास सोडला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था: उत्तर प्रदेश मधील कुशीनगर जिल्ह्यामध्ये एक ह्द्रयद्रावक घटना घडली होती. याठिकाणी बुधवारी रात्री १३ जणांचा विहिरीत पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दुर्घटनेमध्ये ६ महिला आणि ७ मुलींचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या खळबळ माजली होती. घटनास्थळी असलेल्या स्थानिक लोकांनी मदत कार्य केल्याने काही महिलांना बाहेर काढण्यात यश आले होते. अन्यथा याठिकाणी मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असती. या दुर्घटनेमध्ये भारतीय सैन्य दलामधील जवानाची मुलगी असलेल्या पूजा यादव हिने स्वतःच्या जीवाची बाजी लावून ५ जणांना जीव वाचवला होता. (puja risked her life save 5 people but she died heroically in khushinagar delhi)

काय होत घडलं नेमकं

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) मधील गोरखपूर (Gorakhpur) येथे काल रात्री एक मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेमध्ये एक नाही तर तब्बल १३ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विहीरीवर (Well) असलेला स्लॅब कोसळल्यामुळे (slab collapsed) ही घटना घडल्याचे समजत आहे.

हे देखील पहा-

कुशीनगर येथे काल रात्री ८:३० वाजेच्या सुमारास लग्नाच्या (marriage) कार्यक्रमात घडलेल्या या घटनेमध्ये १३ जणांचा विहीरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना घडल्यानंतर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ माजली होती. स्थानिकांच्या मदतीने रात्री मदतकार्य (Help) सुरु होते. गोरखपूर जिल्ह्यामधील (district) नेबुआ नौरंगिया परिसरात नौरंगिया स्कूल टोला येथील एका घरात लग्न समारंभ होता.

यावेळी गावामधील (village) महिला आणि मुली लग्न असलेल्या घराजवळ असलेल्या विहिरीवर उभे होते. हळदीचा विधी सुरु केला जाणार होता. त्याचवेळेस महिला आणि मुली उभ्या असल्याने विहिरीवर लोखंडी जाळी अचानक तुटल्यामुळे महिला आणि मुली विहिरीत पडले आहेत. या घटनेमध्ये काही जण जखमी असून, मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी देखील या घटनेनंतर आपल्या भावना व्यक्त करत, मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे. प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना ४ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे, असे स्थानिक प्रशासनाकडून (administration) सांगण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती

या घटनेची स्थानिकांनी तात्काळ कंट्रोल रुमला फोन करुन पोलिसांना या घटनेसंबंधी माहिती दिली होती. तसेच काही लोकांनी इतरांची वाट न निघता मदत कार्य सुरू केले होते. परंतु महिलांची संख्या अधिक असल्याने काही स्थानिकांची मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाली होती. यामध्ये काही महिलांना बाहेर काढण्यात यश आले होते. परंतु, १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेने संपूर्ण गाव मोठ्या प्रमाणात हादरला आहे. सगळीकडे शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने मृतांच्या नातेवाईकांना ४ लाखांच्या मदतीची घोषणा केली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT