Project Cheetah Saam Digital
देश विदेश

Project Cheetah: कुनो नॅशनल पार्कमधून 'गुड न्यूज', 'आशा'ने दिला ३ पिलांना जन्म

Project Cheetah News: नवर्षाच्या सुरुवातीला मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमधून आनंदाची बातमी आली आहे. मादी चित्ता आशाने ३ पिलांना जन्म दिला आहे. केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्री भूपेंद्र यादव यांनी X वर यासंदर्भात पोस्ट करून माहिती दिली आहे.

Sandeep Gawade

Project Cheetah

नवर्षाच्या सुरुवातीला मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमधून आनंदाची बातमी आली आहे. मादी चित्ता आशाने ३ पिलांना जन्म दिला आहे. केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्री भूपेंद्र यादव यांनी X वर यासंदर्भात पोस्ट करून माहिती दिली आहे. प्रोजेक्ट चीता अंतर्गत आफ्रीकेतून चित्ते भारतात आणण्यात आले होते. मात्र मध्यंतरी काही चित्त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या प्रोजेक्टवर टीकेची झोड उठली होती. दरम्यान आशाने ३ पिलांना जन्म दिल्यामुळे प्रोजेक्टबाबत पुन्हा आशा पल्लवीत झाल्या आहेत.

कुनो नॅशनल पार्कमध्ये सध्या १४ प्रौढ आणि चार पिल्लं आहे. यामध्य गौरव, शौर्य, वायु, अग्नी, पवन, प्रभास आणि पावक यांचा समावेश आहे. यापैकी दोनच चित्ते खुल्या जंगलात असून पर्यटकांना पाहता येतात. उर्वरित सर्व चित्ते सध्या मोठ्या बंदोबस्तात ठेवण्यात आले आहेत. मार्च२०२३ मध्ये ज्वाला या मादी चित्ताने चार पिलांना जन्म दिला होता. मात्र त्यापैकी तीन पिलांचा मृत्यू झाला. ज्वालाला नामिबियातून आणण्यात आले होते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मंत्री भूपेंद्र यादव यांना या गोंडस पिलांचा व्हिडिओ शेअर करत, भारतातील वन्यजीव प्रेमींना शुभेच्छा दिल्या आहेत. पर्यावरण संतुलनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रयत्नातून साकारलेल्या प्रकल्पाचं हे मोठं यश असल्याचं म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UGC Rule: यूजीसीच्या नव्या नियमांना स्थगिती, सर्वोच्च न्यायलयाचा मोठा निर्णय, केंद्र सरकारला झटका

Laxmi Narayana Rajyog: फेब्रुवारी महिन्यात मिथुनसह ४ राशी कमावणार बक्कळ पैसा; लक्ष्मी नारायण योग देणार धन-संपत्ती

'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेत त्या व्यक्तीची दमदार एण्ट्री; सामाजिक क्रांतीचा महत्त्वाचा अध्याय उलगडणार

Ajit Pawar Funeral: अजितदादांना काकी प्रतिभा पवार यांच्याकडून पाणवलेल्या डोळ्यांनी अखेरचा निरोप; पाहा VIDEO

Maharashtra Live News Update : देशाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात

SCROLL FOR NEXT