Priyanka Gandhi; पोलीसांचा प्रोटोकॉल तोडून लखीमपुर मध्ये रवाना Saam Tv
देश विदेश

Priyanka Gandhi; पोलीसांचा प्रोटोकॉल तोडून लखीमपुर मध्ये रवाना

लखीमपुर खीरीत या ठिकाणी ८ शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर उत्तरप्रदेशमध्ये राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : लखीमपुर खीरीत या ठिकाणी ८ शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर उत्तरप्रदेशमध्ये राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. रविवारी रात्री प्रियंका गांधी लखनऊ मध्ये पोहोचले. यानंतर शेतकऱ्यांना भेटण्याकरिता त्या लखीमपुरमध्ये गेल्या असताना त्यांना पोलिसांनी अडवणूक केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मीटिंग घेऊन आदेश दिले की, विरोधी पक्षामधील कोणताही नेता लखीमपुर- खीरी मध्ये जाण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्यांना अटक करण्यात यावी या आदेशानंतर राजकीय नेत्यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात करण्यात आले आहे.

हे देखील पहा-

प्रियंका गांधी म्हणाल्या की, खूप महिन्यांपासून शेतकरी कृषी कायद्याच्या विरोधामध्ये आवाज उठवत आहे. तरी देखील सरकार ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही. सुरवातीपासून शेतकऱ्यांचा आवाज दाबला गेला आहे. भाजपा सरकार हे शेतकऱ्यांना संपून टाकण्याकरिता आणि त्यांचा आवाज दाबण्याच राजकारण करत आहे. हा देश शेतकऱ्यांचा देश आहे. हा देश भाजपच्या विचारधारेवर चालणारा देश नाही.

या देशाला शेतकऱ्यांनी बनवल आहे. प्रियंका गांधी पुढे म्हणाले की जेव्हा सरकार आणि पोलीस शक्तीचा वापर करत असते तेव्हा त्यांची नैतिकता संपली असते. मी माझ्या घरामधून बाहेर पडून कोणताही अपराध करणार नाही. मी फक्त मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्याकरिता जात आहे. लखीमपुर मध्ये झालेल्या हिंसाचारात बाबत बोलताना ही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, सरकार या घटनेच्या मुळापर्यंत जाणार आहे. त्यांनी लोकांना घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sugar Free Drink : शुगर फ्री ड्रिंक डायबिटीज रूग्णांसाठी हानिकारक की फायद्याचे?

Maharashtra News Live Update: बेळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांचा ताफा अडवला

Honey Tea : मधाच्या चहाचे ७ फायदे वाचून तुम्ही आजपासून प्यायला सुरुवात कराल, दूध-साखरेचा चहा विसराल

Rasgulla Recipe: गोड खायला आवडतं? मग घरच्या घरी बनवा रसाळ रसगुल्ले, वाचा सोपी रेसिपी

Madhuri Dixit: धकधक गर्लचा जलवा; माधुरी दीक्षितचा निळ्या साडीतील दिलखेचक लूक व्हायरल

SCROLL FOR NEXT