PRIYANKA GANDHI TO LEAD CONGRESS-SP SEAT SHARING TALKS AHEAD OF UP ELECTIONS saam tv
देश विदेश

विधानसभा निवडणुकीआधीच राजकीय हालचालींना वेग, आघाडीचा चेंडू प्रियंकांच्या कोर्टात, पक्षप्रमुखांशी चर्चा करणार

UP Assembly Elections: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मोठी रणनीती आखली आहे. समाजवादी पक्षासोबतच्या जागावाटपाच्या चर्चेची जबाबदारी प्रियंका गांधी यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे.

Omkar Sonawane

पुढील वर्षी उत्तर प्रदेशसह पाच राज्याच्या निवडणुका होणार आहे. दिल्लीची सत्ता काबिज करायची असेल तर उत्तर प्रदेशच्या विधानसभेवर झेंडा फडकवणे राजकारणात महत्वाचे मानले जाते. असं म्हणतात दिल्लीचा रस्ता हा उत्तर प्रदेशमधूनच जातो. त्यामुळे भाजप हॅटट्रीक मारण्याच्या तयारीत आहे, तर समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा अखिलेश यादव हे कमबॅक करण्यासाठी कंबर कसत आहेत. या निवडणुकीत काँग्रेस आणि समाजवादी पक्षाची आघाडी होणार असल्याची चर्चा सुरू आहे. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मोठी रणनीती आखली आहे. समाजवादी पक्षासोबतच्या जागावाटपाच्या चर्चेची जबाबदारी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीसाठी राजधानी दिल्लीमध्ये वरिष्ठ नेत्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत निवडणुकीची रणनीती निश्चित करण्यात आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशचे प्रभारी राजेंद्र पाल गौतम तसेच प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आणि खासदार इमरान मसूद यांना महत्वाचे निर्देश दिले आहेत. युतीतील मित्रपक्षांबाबत माध्यमांमध्ये कोणतीही अनावश्यक वक्तव्ये करू नयेत, अशा स्पष्ट सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. बैठकीनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी एक्सवर ट्विट करत भाजपवर निशाणा साधला. उत्तर प्रदेशमध्ये सलग दोन वेळा सत्तेत असलेल्या भाजप सरकारमधून जनतेला बदल हवा असल्याचे त्यांनी म्हटले.

बैठकीनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट करत भाजप सरकारवर निशाणा साधला. उत्तर प्रदेशमध्ये सलग दोन वेळा सत्तेत असलेल्या भाजप सरकारमधून जनतेला बदल हवा असल्याचे त्यांनी म्हटले. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही इंडिया आघाडीच्या एकजुटीबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. जागावाटपाबाबत अद्याप चर्चा सुरू झालेली नसली, तरी इंडिया आघाडी एकत्रितपणे ही निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पत्रकारांशी बोलताना अखिलेश यादव म्हणाले, जागावाटपाबाबत अद्याप चर्चा झालेली नाही. इंडिया आघाडी एकत्र निवडणूक लढवेल. एकमेकांचा सन्मान राखून जागांचे वाटप केले जाईल आणि सर्वात मजबूत उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवले जातील. दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ सरकारला सत्तेतून बाहेर करण्यासाठी काँग्रेस आणि समाजवादी पक्ष पुन्हा एकदा एकत्र येण्याच्या तयारीत आहेत. आता प्रियंका गांधी आणि अखिलेश यादव यांच्यातील जागावाटपाची चर्चा कशी होते आणि दोन्ही पक्षांमध्ये किती जागांवर सहमती होते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'गिरीश महाजन संकटमोचक आहे, पण लय लफडेबाज माणूस'; गुलाबराव पाटलांचं विधान

Maharashtra News Live Update: जुहू कोळीवाडा स्मशानभूमीजवळ व्हीबीएसएल साइटवर क्रेन कोसळली

Fact Check: 'द रॉक'ला टीबीची लागण? टीबीमुळे हट्टाकट्टा रॉक झाला हाडकुळा?

जिल्हा बँक निवडणुकीत मातब्बर नेत्यांना हायकोर्टाचा मोठा धक्का; सहा माजी संचालकांचे याचिका फेटाळली

IAS Transfer: १६ IAS अधिकाऱ्यांसह ५ जिल्हाधिकाऱ्यांच्याही तडकाफडकी बदल्या, प्रशासनात मोठा फेरबदल

SCROLL FOR NEXT