देश विदेश

School Fee hike : शाळा की लुटीचे कारखाने? फीमध्ये झाली इतक्या टक्क्यांनी वाढ, पाहा व्हिडिओ

Private School : देशात वाढत्या महागाईने आधीच सामान्य वर्गाचं कंबरडं मोडलंय....त्यातच पालकांच्या खांद्यावर शांळाच्या शुल्कवाढीचे ओझे दरवर्षी वाढतंय...मागील तीन वर्षांत देशभरातील खाजगी शाळांच्या शुल्कामध्ये किती वाढ झालीये आणि त्याचा कसा फटका सर्वसामान्यांना कसा बसलाय पाहूया..

Vishal Gangurde

देशातील शिक्षण दिवसेंदिवस महाग होत चाललं आहे. गेल्या तीन वर्षांत देशभरातील खाजगी शाळांच्या शुल्कामध्ये तब्बल 50 ते 80 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एका संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणात देशभरातील 300 हून अधिक जिल्ह्यांमधील 85 हजारांहून अधिक पालकांबरोबर संवाद साधण्यात आला.आणि त्यातून देशभरात खाजगी शाळा दरवर्षी 10-15 टक्के शुल्क वाढवत असल्याचं समोर आलं. तर महाराष्ट्रातही 44 टक्के पालकांनी त्यांच्या पाल्यांच्या शाळेच्या फी मध्ये 50 ते 80 टक्क्यांची वाढ झाल्याचं सांगितलंय.

शाळा की लुटीचे कारखाने ?

गेल्या तीन वर्षांत शुल्कात 50 टक्क्यांहून अधिक वाढ, 42 टक्के पालकांची माहिती

26 टक्के पालकांकडून 80 टक्क्यांपर्यंत शुल्क वाढीची माहिती

अनेक खासगी शाळांकडून वाढीव शुल्कात बांधकाम, तंत्रज्ञान, देखभाल शुल्काचा समावेश

करोनानंतर शाळांकडून खाजगी वाहतूक, डिजिटल शिक्षणाच्या नावाखाली अतिरिक्त पैशांची मागणी,पालकांचे आरोप

फी वाढीवर पालकांच्या प्रतिक्रिया

खाजगी शाळांच्या फी वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष समितीची स्थापना करण्याची राज्यसरकारची घोषणा हवेतच विरल्याचं चित्र आहे.शाळांच्या वाढत्या शुल्कावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने काही नियम बनवले आहेत मात्र त्या नियमांनाही धडधडीतपणे केराची टोपली दाखवली जाते.

तीन वर्षातली 80 टक्कयांची ही वाढ ही केवळ शालेय शिक्षणातली आहे.वेगवेगळ्या अभ्यासक्रमांनुसार ही फी वाढ बदलत असते.ही अनियंत्रित वाढ रोखण्यासाठी कुणीच प्रतिबंध करत नसल्यानं खाजगी शाळा म्हणजे लुटीचे कारखाने बनले आहेत आणि त्याचा फटका मात्र सामान्यांना बसतो आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bareli Protest : बरेलीत नमाजावेळी मोठा गोंधळ, शेकडो आंदोलक रत्यावर उतरले; पोलिसांचा लाठीचार्ज

Vastu Tips Of Lighting Diya: घरात या दिशेला ठेवू नये पेटता दिवा, ओढवेल मोठं संकट

Washim Accident: वाशिममध्ये भीषण अपघात! १३ चिमुकल्यांना घेऊन जाणारी व्हॅन खड्ड्यात पलटली अन् पुढे...

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आदिवासींची महापंचायत

SCROLL FOR NEXT