Sanjay Shah Saam Tv
देश विदेश

CEO Death: लोखंडी पिंजऱ्यातून स्टेजवर एन्ट्री घेताना सीईओचा मृत्यू, हैदराबादमधील घटना

CEO Died In Iron Cage Accident: हैदराबादमधील खासगी कंपनीच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्यातील एक धक्कादायक घटना घडली आहे. लोखंडी पिंजऱ्यातून स्टेजवर एन्ट्री घेताना सीईओचा मृत्यू झालाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Silver Jubilee Ceremony In Hyderabad

हैदराबादमधील (Hyderabad) रामोजी फिल्म सिटी येथे एका खासगी कंपनीच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्यादरम्यान एक अपघात झालाय. या अपघातात एका खासगी कंपनीच्या सीईओला आपला जीव गमवावा लागला, तर दुसरा अधिकारी गंभीर जखमी झाला.

गुरुवारी सायंकाळी हा रौप्य महोत्सवी समारंभ सुरू होता. तेव्हा कंपनीचे सीईओ संजय शहा आणि त्यांचे सहकारी राजू हे लोखंडी पिंजऱ्यातून स्टेजवर प्रवेश करत होते. त्यानंतर पिंजऱ्याला आधार देणारी लोखंडी साखळी एका बाजूने तुटली, आणि त्या पिंजऱ्यात बसलेले सीईओ आणि त्यांचे सहकारी खाली पडले, अशी माहिती पोलिसांनी दिलीय. पिंजरा उंचावरून स्टेजवर खाली येत होता.

संजय शहा आणि त्यांच्या सहकाऱ्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान शहा यांचा मृत्यू झालाय. त्यांच्या सहकाऱ्याची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी सांगितले की, कंपनीच्या अधिकाऱ्याच्या तक्रारीच्या आधारे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला (Hyderabad) आहे.

संजय शाह (56) हे Vistex Asia Pacific Private Limited कंपनीचे CEO होते. ही अमेरिकेतील बहुराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपनी आहे. अपघातात जखमी झालेले शाह यांचे सहकारी कंपनीचे अध्यक्ष आहेत.

सीईओ शहा यांचा उपचारादरम्यान मृत्यू

अपघाताबाबत माहिती देताना अब्दुल्लापूरमेट पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक डी करुणाकर रेड्डी म्हणाले की, कार्यक्रमादरम्यान मोठ्या आवाजात गाणे वाजत होते. खाली येताना शहा आणि राजू पिंजऱ्यातून उत्साहात एन्ट्री घेत होते. यावेळी पिंजऱ्याला जोडलेल्या दोन तारांपैकी एक तार तुटली. दोघेही 15 फुटांपेक्षा जास्त उंचीवर होते. पिंजऱ्याच्या तारा तुटल्यानंतर दोघेही काँक्रीटच्या स्टेजवर पडले. यात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात नेण्यात आलं. त्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं तेथे कंपनीचे सीईओ संजय शहा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

IPC कलम 304A अंतर्गत इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. RFC व्यवस्थापन, त्याचे वरिष्ठ इव्हेंट मॅनेजर, मुख्य व्यवस्थापक (सुरक्षा), स्पेशल इफेक्ट कॉन्ट्रॅक्टर आणि केज ऑपरेटर यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Final Results : महाराष्ट्र कुणाचा? विधानसभा निवडणूक निकालाचे सविस्तर अपडेट्स एका क्लिकवर

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT