Narendra Modi Oath Ceremony: Saamtv
देश विदेश

Narendra Modi Oath Ceremony: '१०० दिवसांच्या अजेंड्यावर काम करण्यास सज्ज व्हा', नरेंद्र मोदींचा भावी मंत्र्यांना कानमंत्र; शपथविधीपूर्वी घेतली शाळा!

Narendra Modi Oath Ceremony NDA Leaders Tea Meeting: देशाचे नवे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी तिसऱ्यांचा शपथ घेणार आहेत. तत्पुर्वी भावी मंत्र्यांची मोदींच्या निवासस्थानी बैठक झाली. यावेळी त्यांनी नव्या मंत्र्यांना मार्गदर्शन केले.

Pramod Subhash Jagtap

दिल्ली, ता. ९ जून २०२४

देशातील लोकसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर आज नव्या सरकारची स्थापना होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारचे नेते मंत्रीपदाची शपथ घेतील. एकूण ६५ खासदार आज मंत्रीपदाची शपथ घेतील. या शपथविधी सोहळ्यापुर्वी नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी संभाव्य मंत्र्यांची बैठक झाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या मंत्र्यांना मार्गदर्शन केले.

मोदींचा भावी मंत्र्यांना कानमंत्र!

पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत नरेंद्र मोदींनी संभाव्य मंत्र्यांना 100 दिवसांच्या अजेंड्यावर काम करण्यास तयार राहण्यास सांगितले आहे. मंत्रिमंडळात सामील झाल्याबद्दल मोदींनी सर्वांचे अभिनंदन केले. तसेच आपल्याला विकसित भारताचा अजेंडा पुढे चालू ठेवण्याची गरज आहे. कोणत्याही व्यत्ययाशिवाय विकासकामे सुरू राहणार आहेत. 100 दिवसांच्या आराखड्यावर काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

नेमकं काय म्हणाले?

"सर्व खासदार सारखेच आहेत. प्रामाणिकपणावर लक्ष केंद्रित करा. गरीब लोक आणि कामगारांवर विशेष लक्ष द्या. किमान चार दिवस मंत्रालयात काम करा आणि उरलेला वेळ शेतात घालवा. कोणत्याही पदावर कुटुंबीय किंवा नातेवाईकांची नियुक्ती करू नका. असा संदेश देत नरेंद्र मोदींनी भावी मंत्र्यांना राष्ट्रपती भवनात वेळेपूर्वी पोहोचण्यास सांगितले.

दरम्यान, नरेंद्र मोदींच्या नव्या सरकारमध्ये 65 मंत्री शपथ घेणार आहेत. मोदी आज राष्ट्रपती भवनात तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत मंत्र्यांचाही शपथविधी होणार आहे. राज्यातून मुरलीधर मोहोळ, नितीन गडकरी, रामदास आठवले, रक्षा खडसे, प्रतापराव जाधव, पियुष गोयल यांची मंत्रीपदी वर्णी लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BSNL चा धमाका! अनलिमिटेड कॉलिंग अन् १०० जीबी डेटा; विद्यार्थांसाठी आणला नवा प्लॅन

Shocking : क्षणात सर्व काही संपलं! सौदी अरेबियातील भीषण अपघात एकाच कुटुंबातील १८ लोकांचा मृत्यू

Income Tax Refund: करदात्यांसाठी बातमी, कर परतावा कधी मिळणार, आली महत्त्वाची अपडेट

Maharashtra Politics: चंद्रपुरात भाजपसोबत मोठा गेम,४ नगरपरिषदांमध्ये पक्षात्तर करत थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांविरोधातच बंडखोरी

Supreme Court :...तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रद्द करू; निवडणुकीच्या तोंडावर सुप्रीम कोर्टाचा सरकारला इशारा

SCROLL FOR NEXT