पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसीय अमेरिकेच्या दौऱ्यावर; विमानतळावर जंगी स्वागत Twitter/@ANI
देश विदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसीय अमेरिकेच्या दौऱ्यावर; विमानतळावर जंगी स्वागत

भारत आणि अमेरिकेचं नातं अजून घट्ट होणार

वृत्तसंस्था

वॉशिंग्टन - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 23 सप्टेंबर रोजी तीन दिवसीय अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. आज ते वॉशिंग्टनला पोहोचले आहेत. यावेळी वॉशिंग्टनमध्ये नरेंद्र मोदी यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी मोदींच्या स्वागतासाठी विमानतळावर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयातील अनेक अधिकारी पोहोचले होते. विमानतळावर १०० पेक्षा जास्त भारतीय लोक पोहोचले होते. विमानतळावर उपस्थित भारतीयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वॉशिंग्टनमध्ये पोहचताच घोषणा देण्यास सुरु केली. पंतप्रधान मोदींची भर पावसात भारतीय अमेरिकन वाट पाहत होते. या लोकांना भेटण्यासाठी पीएम मोदी खास त्यांच्या कारमधून खाली उतरले.

या दौऱ्यावर, पीएम मोदी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला संबोधित करणार आहे तसेचते ते क्वाड देशांच्या नेत्यांसोबत बैठक घेणार आहेत. याशिवाय, नरेंद्र मोदी व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत.

h

वॉशिंग्टनमध्ये पोहोचल्याची माहिती मोदींनीही ट्विट करून दिली. या ट्विटमध्ये ते म्हणले की, 'वॉशिंग्टन डीसीला पोहोचलो असून पुढील दोन दिवसात मी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस, स्कॉट मॉरिसन, योशीहिदे सुगा यांची भेट घेणार आहे. तसंच या काळात क्वाड मिटिंगमध्ये सहभागी होणार आहेत. टॉप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटणार असून भारतातील आर्थिक कामगिरी त्यांच्यासमोर मांडेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी इंडिया आघाडीचा मोर्चा- वर्षा गायकवाड

Congress Protest Live Update : इंडिया आघाडीच्या थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा

Joint pain causes: सांधे दुखत असतील तर सावध व्हा! वाढतं वयच नाही, तर ही कारणंही ठरू शकतात सांधेदुखीला जबाबदार

Seasonal Fruits : कोणत्या हंगामात कोणती फळे खावी? ९९% लोक करतात 'ही' १ चूक

ATM Robbery : नाईटी, मास्क घालून आले अन् SBI चं एटीएम फोडले; २५ लाख घेऊन चोर पसार, CCTV पाहून पोलीसही चक्रावले

SCROLL FOR NEXT