Video| पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रीगुरु डाॅ. बालाजी तांबेंना श्रद्धांजली  Saam Tv
देश विदेश

Video| पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रीगुरु डाॅ. बालाजी तांबेंना श्रद्धांजली

आयुर्वेदाला जागतिक स्तरावर प्रसिद्ध करण्यात श्रीगुरु डाॅ. बालाजी यांनी घेतलेल्या प्रयत्नांसाठी ते नेहमी ओळखले जातील.

वृत्तसंस्था

आयुर्वेद आणि योग शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचे व्रत घेतलेल्या श्रीगुरु डाॅ. बालाजी तांबे यांची प्राणज्योत मंगळवारी मालवली. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. ते ८१ वर्षांचे होते. गेल्या आठवड्यात त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्या पश्चात पत्नी वीणा, मुलगा सुनिल आणि संजय आणि स्नूषा व नातवंडे असा परिवार आहे. 

श्रीगुरु डाॅ. बालाजी तांबे  यांच्या  निधनानंतर आता महाराष्ट्रातील सर्व पक्षीय राजकीय नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. बुधवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरुन श्रीगुरु डाॅ. बालाजी तांबे  यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

ट्विटरवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  श्रीगुरु डाॅ. बालाजी तांबे यांचा उल्लेख आयुर्वेदाला जगभरामध्ये प्रसिद्धी मिळवून देणारे असा केला आहे. आयुर्वेदाला जागतिक स्तरावर प्रसिद्ध करण्यात श्रीगुरु डाॅ. बालाजी यांनी घेतलेल्या प्रयत्नांसाठी ते नेहमी ओळखले जातील.खास करुन श्रीगुरु डाॅ. बालाजी तांबे यांनी तरुणांमध्ये आयुर्वेदाला लोकप्रिय केलं. ते त्यांच्या दयाळू स्वभावामुळे कायमच लक्षात राहतील. श्रीगुरु डाॅ. बालाजी यांच्या निधाने दु:ख झालं. मी त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करतो, ओम शांती,” असं ट्विट नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pravin Tarde: बॉलिवूडवाले अंत्यविधीला न आल्याने नाना पाटेकरांचं मोठेपण कमी होत नाही...; प्रवीण तरडे स्पष्टच बोलले

इंडिया आघाडीच्या मोर्चादरम्यान ठाकरे गटाला मोठा धक्का; पक्ष प्रवक्त्याचा तडकाफडकी राजीनामा

Bedroom Decoration Ideas For Couple : रोमॅन्टिक कपलसाठी बेडरूम डेकोरशनच्या 5 भन्नाट आयडिया, आनंददायी वाटेल

Navratri 2026 : नवरात्रीत देवीसमोर 'या' दिशेला लावा अखंड दिवा; घरात येईल पैसाच पैसा

Congress Protest Live Update : इंडिया आघाडीचा थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा

SCROLL FOR NEXT