Security forces were scrambled in Bengaluru after gelatin sticks were found on the route of Prime Minister Modi's convoy. saam tv
देश विदेश

मोठी बातमी! PM मोदींच्या सुरक्षेत मोठी चूक, ताफ्याच्या मार्गात सापडल्या जिलेटिनच्या कांड्या

Gelatin Discovered PM Modi’s Convoy Route : पंतप्रधान मोदी बेंगळूरूच्या बाहेरील आंतरराष्ट्रीय केंद्रात श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आले होते.

Bharat Jadhav

  • पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत मोठी त्रुटी उघड.

  • ताफ्याच्या मार्गावर जिलेटिनच्या कांड्या सापडल्या.

  • बेंगळूरूमध्ये सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत मोठी त्रुटी आढळून आली. बेंगळूरूमध्ये रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनच्या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदींना उपस्थिती राहणार होते. कार्यक्रमासाठी मोदी ज्या मार्गे जाणार होते, त्याच मार्गात जिलेटिनच्या कांड्या सापडल्याने सुरक्षेत मोठी खळबळ उडाली. ही घटना बेंगळूरूच्या बाहेरील कनकपुरा रोडवर घडली. याप्रकरणी पोलिसांनी लागलीच अॅक्शनमध्ये येत एका संशयितला ताब्यात घेतले आहे. त्याला चौकशीसाठी एका गृप्त ठिकाणी नेण्यात आले आहे.

जिलेटिनच्या कांड्या सापडल्यानंतर पोलिसांनी परिसरात नाकाबंदी केली आहे. ही घटना रविवारी सकाळी घडली, जेव्हा बेंगळूरुमधील कग्गलीपुरा परिसराजवळील थथागुनी येथे सुरक्षा तपासणीदरम्यान पोलिसांना जिलेटिनच्या कांड्या सापडल्या. हे ठिकाण 'आर्ट ऑफ लिव्हिंग' केंद्राकडे जाणाऱ्या मार्गाच्या अगदी जवळ सापडल्या

एका अज्ञात व्यक्तीने पोलिसांनी फोन करत बॉम्बस्फोटाची धमकी दिली होती. एचएएल विमानतळावर आणि आर्ट ऑफ लिविंग सेंटरजवळ हल्ला होतील, अशी धमकी दिली होती. धमकीच्या या कॉलनंतर पोलीस अॅक्शन मोडवर आले, त्यांनी सर्वत्र तपास सुरू केला. धमकीत उल्लेख करण्यात आलेल्या ठिकाणी शोधमोहीम सुरू करण्यात आली.

एचएएल विमानतळाजवळ काहीही संशयास्पद गोष्टी आढळल्या नाहीत. मात्र कनकपुरा रोडवर जिलेटीनच्या कांड्या सापडल्यानंतर पोलिसांनी ज्या नंबरवरून फोन आला होता. त्याचे लोकेशन शोधून संशयिताला कोरमंगला भागातून ताब्यात घेण्यात आले.

संशयिताची गुन्हेगारी पार्श्वभूमी

अटक केलेल्या व्यक्तीच्या चौकशी केल्यानंतर धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. तपास अधिकाऱ्यांच्या मते, या व्यक्तीने यापूर्वीही बेंगळूरुमधील व्हीआयपींच्या भेटीदरम्यान अशाच प्रकारचे धमकीचे फोन कॉल केले होते. याआधीच्या प्रकरणांमध्ये पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते, परंतु त्याच्या मानसिक स्थितीमुळे ताकीद देऊन सोडून दिले होते. मात्र यावेळी हे प्रकरण अधिक गंभीर आहे, कारण केवळ धमक्याच देण्यात आल्या नाहीत, तर स्फोटक साहित्यही जप्त करण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : मोठी बातमी: मुंबईत भाजप आमदाराच्या कारचा भीषण अपघात, फ्री वे वर ३ वाहनांना धडक

Maharashtra News Live Update: रोहित पवारांचा दुष्काळी दौरा; ‘काजू-बदाम खाऊन तरी बुद्धी चालवा’, सरकारवर जोरदार टीका

मोठी बातमी! मिरजमध्ये सरकारी रुग्णालयाचा स्लॅब कोसळला; 6 जण ढिगाऱ्याखाली अडकले, 2 जणांचा मृत्यू

8th Pay Commission Update: 3.25 फिटमेंट फॅक्टरची मागणी चर्चेत; केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत मोठी अपडेट

Actress Death: चित्रपटसृष्टीला मोठा धक्का; ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

SCROLL FOR NEXT