Paper Leak Bill Saam Tv
देश विदेश

Paper Leak Bill: 10 वर्षांचा तुरुंगवास, 1 कोटी दंड; पेपरफुटीविरोधातील विधेयक लोकसभेत मंजूर; वाचा सविस्तर

Lok Sabha Session 2024 : पेपरफुटीविरोधातील विधेयक सरकारने लोकसभेत मंजूर केले आहे. सरकारने हे विधेयक सोमवारी सभागृहात मांडले होते.

Satish Kengar

Paper Leak Bill:

पेपरफुटीविरोधातील विधेयक सरकारने लोकसभेत मंजूर केले आहे. सरकारने हे विधेयक सोमवारी सभागृहात मांडले होते. हे विधेयक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटणाऱ्या दोषींना शिक्षा करण्यासाठी आणलेले नवीन विधेयक आहे.

यामध्ये शालेय परीक्षा, महाविद्यालयीन परीक्षा आणि सरकारी नोकऱ्यांच्या परीक्षांचा समावेश आहे. या विधेयकात सरकारने दोषींवर कठोर तरतुदी लागू केल्या आहेत. दोषी आढळल्यास 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 1 कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद यात करण्यात आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लोकसभेत 6 फेब्रुवारी रोजी पेपरफुटीविरोधातील नवीन विधेयक सरकारने मंजूर केले आहे. आता ते वरिष्ठ सभागृहात मांडले जाईल आणि त्यानंतर राष्ट्रपतींच्या औपचारिक मंजुरीनंतर त्याचे कायद्यात रूपांतर होईल.  (Latest Marathi News)

पेपरफुटीविरोधातील हे विधेयक त्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारे आहे, जे वर्षभर मेहनत करून परीक्षा उत्तीर्ण होऊन आपल्या पायावर उभे राहण्याचं स्वप्न बघतात.

विधेयकात अनेक कडक तरतुदी

या विधेयकानुसार, परीक्षेचे पेपर लीक करताना किंवा उत्तरपत्रिकांमध्ये छेडछाड करणाऱ्यांना 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दोषी आढळल्यास 1 कोटी रुपयांचा दंड होऊ शकतो. विशेष म्हणजे या विधेयकानुसार सर्व गुन्हे अजामीनपात्र असतील. तसेच पोलिसांना स्वतःहून कारवाई करण्याचा आणि वॉरंटशिवाय संशयितांना अटक करण्याचे अधिकार असतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed : दिवाळीत गोरगरिबांना किडे, बुरशीयुक्त तांदूळाचे वाटप; बीड तालुक्यातील संतापजनक प्रकार

Pune Shaniwar Wada : पुण्यातील शनिवारवाड्यात नमाज पठण? Video

आंघोळ कधी वापरतात माहितीये का? तुम्हीही चुकीचा शब्द वापरताय

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा, प्रवाशांना मोठा मनस्ताप|VIDEO

Samsung Diwali Sale: सॅमसंगची धासू ऑफर, Galaxy S24 FE दिवाळीच्या सेलमध्ये अर्ध्या किमतीत

SCROLL FOR NEXT