King Charles: किंग चार्ल्स यांना कर्करोगाचे निदान, मुंबईचे डबेवाले झाले भावुक; देवाला घातलं साकडं

Mumbai Dabbawala: ब्रिटनचे किंग चार्ल्स तिसरा यांना कर्करोगाचे निदान झालं आहे. बँकिंगहॅम पॅलेसने या संदर्भात एक निवेदन जारी करून ही माहिती दिली आहे.
Mumbai Dabbawala On King Charles
Mumbai Dabbawala On King CharlesSaam Tv
Published On

>> संजय गडदे

Mumbai Dabbawala On King Charles:

ब्रिटनचे किंग चार्ल्स तिसरा यांना कर्करोगाचे निदान झालं आहे. बँकिंगहॅम पॅलेसने या संदर्भात एक निवेदन जारी करून ही माहिती दिली आहे. मात्र हा कर्करोग कोणत्या प्रकारचा आणि शरीराच्या कोणत्या भागात आहे, हे मात्र अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.

किंग चार्ल्स संदर्भात आलेल्या या बातमीमुळे मुंबईचे डबेवाले काहीसे भावुक झाले असून त्यांनी चार्ल्स यांना उत्तम आरोग्य लाभावे यासाठी देवाकडे प्रार्थना देखील केली आहे. किंग चार्ल्स आणि मुंबईचे डबेवाले यांचे अतूट असे नाते आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mumbai Dabbawala On King Charles
King Charles: किंग चार्ल्स यांना कॅन्सरचं निदान, बकिंगहॅम पॅलेसने दिली माहिती

यापूर्वी किंगचार्ल्स यांच्या विवाहाला देखील मुंबई डबेवाल्यांनी उपस्थिती लावली होती. यानंतर किंग चार्ल्स यांनी जेव्हा ब्रिटनच्या राजघराण्याची गादीची सूत्रे सांभाळली, त्यावेळी देखील मुंबई डबेवाले या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले होते.

जलद स्वास्थ्य लाभ व्हावा यासाठी पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या आणि भारतीय जनतेच्या वतीने आज ब्रिटनचे किंग चार्ल्स यांना जलद स्वास्थ्य लाभ व्हावा यासाठी तसेच उत्तम आरोग्य प्राप्तीसाठी शुभेच्छा दिल्या. किंग चार्ल्स कर्करोगाने ग्रस्त झाल्याची बातमी कळवलेल्या पोस्टला प्रतिक्रिया देताना, पंतप्रधानांनी X म्हटलं आहे की, "किंग चार्ल्स तिसरे यांना जलद स्वास्थ्य लाभ व्हावा आणि चांगले आरोग्य लाभावे यासाठी मी संपूर्ण भारतीय जनतेसह शुभेच्छा देत आहे.”

Mumbai Dabbawala On King Charles
Samsung ने आणला रफ अँड टफ वॉटरप्रूफ फोन, उंचीवरून पडला तरी काही होणार नाही; मिळणार दोन वर्षांची वॉरंटी

दरम्यान, राजघराण्याने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, किंग चार्ल्स यांनी आजपासून नियमित उपचार सुरू केले आहेत. यावेळी डॉक्टरांनी त्यांना आपली जबाबदारी सोडून सर्वसामान्यांच्या कार्यक्रमात सहभागी न होण्याचा सल्ला दिला आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com