INS Vindhyagiri Launc Saamtv
देश विदेश

INS Vindhyagiri Launch: नौदलाची ताकद वाढणार! 'INS विंध्यगिरी' युद्धनौकचे राष्ट्रपतींकडून उद्घाटन; जाणून घ्या खास वैशिष्ट्ये

INS Vindhyagiri Features: विंध्यगिरी हे भारताच्या प्रकल्प 17A चे सहावे जहाज आहे. या युद्धनौकेमुळे भारतीय नौदलाची ताकद आणखी वाढली आहे.

Gangappa Pujari

Kolkata News: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते (17 ऑगस्ट) कोलकाता येथे 'विंध्यगिरी' या युद्धनौकेचे जलावतरण करण्यात आले. विंध्यगिरी हे भारताच्या प्रकल्प 17A चे सहावे जहाज आहे. या युद्धनौकेमुळे भारतीय नौदलाची ताकद आणखी वाढली आहे. या वेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित होत्या. काय आहेत या युद्धनौकेची खास वैशिष्टे आणि ताकद जाणून घेवू सविस्तर..

याबाबत अधिक माहिती अशी की, या विशेष युद्धनौका भारतातच तयार करण्यात आल्या आहेत. ही युद्धनौका कोलकात्याच्या गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेडने तयार केली आहे. ‘प्रोजेक्ट १७ अल्फा’ अंतर्गत बांधण्यात आलेल्या ‘शिवालिक’ श्रेणीतील ‘आयएनएस विंध्यगिरी’ ही सहावी युद्धनौका आहे.

याआधी प्रोजेक्ट १७ अल्फा’अंतर्गत सात युद्धनौकांची निर्मिती. त्यांची नावे ‘निलगिरी’, ‘उदयगिरी’, ‘दुनागिरी’, ‘तारागिरी’, ‘हिमगिरी’ आणि ‘महेंद्रगिरी या युद्धनौकांची निर्मिती करण्यात आली आहे.

आयएनएस विंध्यगिरीची खास वैशिष्टे...

ही युद्धनौका प्रोजेक्ट 17 क्लास फ्रिगेट्स (शिवालिक क्लास) साठी फॉलो-ऑन आहेत. ज्यामध्ये सुधारित स्टेल्थ वैशिष्ट्ये, प्रगत शस्त्रे आणि सेन्सर्स आणि प्लॅटफॉर्म व्यवस्थापन प्रणाली आहेत. जवळपास 31 वर्षे जुन्या INS विंध्यगिरीने भारतीय नौदलाची सेवा केली आणि या काळात अनेक आव्हानात्मक मोहिमा आणि परदेशी सराव पाहिले. त्यानंतर आता नवीन तंत्रज्ञानासह नवीन विंध्यगिरी नौदलाच्या ताफ्यात सामील होत आहे.

  • कर्नाटकातील पर्वतरांगेवरून ‘विंध्यगिरी’ हे नाव ठेवण्यात आले आहे.

  • INS विंध्यगिरी ही स्वदेशी प्रकल्प 17-A फ्रिगेटची सहावी युद्धनौका आहे.

  • ही नौका 28 नॉट्सच्या वेगाने म्हणजे समुद्राच्या लाटांवर ताशी 52 किमी वेगाने धावू शकते

  • ती 6 हजार 670 टन दारूगोळा आणि इतर वस्तू सोबत घेऊन जाऊ शकते.

  • आयएनएस विंध्यगिरी बराक-8 क्षेपणास्त्र डागण्यास सक्षम आहे.

  • भारताचे प्राणघातक क्षेपणास्त्र ब्रह्मोस हे युद्धनौकेवरूनही प्रक्षेपित केले जाऊ शकते.

  • आयएनएस विंध्यगिरी अत्याधुनिक रडार यंत्रणा आणि पाणबुडीविरोधी शस्त्र प्रणालींनी सुसज्ज आहे.

  • 150 मीटर लांब आणि 37 मीटर उंचीची ही युद्धनौका शत्रूंच्या होशांना उडवून देणारी समुद्रातील सर्वात शक्तिशाली संरक्षक आहे.

  • प्रकल्प 17A अंतर्गत युद्धनौका बांधल्या जात आहेत.

M/s MDL एकूण चार जहाजे बांधत आहे आणि M/s GRSE प्रकल्प 17A उपक्रमाअंतर्गत आणखी तीन जहाजे बांधत आहे. या प्रकल्पाची पहिली पाच जहाजे MDL आणि GRSE द्वारे 2019-2022 दरम्यान लाँच करण्यात आली आहेत.

या युद्धनौकेची सर्व उपकरणे आणि तंत्रज्ञानासाठी 75 टक्के ऑर्डर लघु आणि मध्यम उद्योगांसह (एमएसएमई) परदेशी कंपन्यांकडून घेण्यात आल्या. जे संरक्षण तंत्रज्ञानामध्ये आत्मनिर्भरता मिळविण्यासाठी भारताची दृढ वचनबद्धता दर्शवते.

भारताची ताकद वाढणार..

दरम्यान, हजारो कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेली ही युद्धनौका देशाच्या सीमा अधिक सुरक्षित ठेवण्यासाठी बनवण्यात आली आहे. या युद्धनौकेमुळे नौदलाची ताकद अनेक पटींनी वाढणार आहे. चीन आणि त्याचा आश्रयदाता पाकिस्तानच्या नापाक रचनेमुळे हे जहाज नौदलासाठी समुद्रात अत्यंत महत्त्वाचे आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT