Viral Photoshoot
Viral Photoshoot Saamtv
देश विदेश

Viral Photoshoot News: अरे, काय हे! चक्क नाल्यात प्री वेडिंग फोटोशूट, कचऱ्यात दिल्या अशा रोमँटिक पोझ; फोटो VIRAL

Gangappa Pujari

Viral Wedding Photoshoot: लग्न म्हणलं की प्रत्येकजण आनंदात असतो. लग्न हा दोन जीवांच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा क्षण. हा क्षण अविस्मरणीय व्हावा, आयुष्यभर आठवणीत राहावा यासाठी प्रत्येकजण खास प्रयत्न करत असतो. अलिकडच्या काळात लग्नात अनेक नवनवीन प्रकार पाहायला मिळतात. त्यामधीलच एक म्हणजे प्री- वेडिंग फोटोशूट.

प्री- वेडिंग (Pre Wedding) फोटोशूटची सध्या तरुण तरुणींमध्ये चांगलीच क्रेझ आहे. प्रत्येकजण आपल्या हटके स्टाईलने प्री वेडिंग फोटोशूट करत असतो. मात्र, सध्या एका फोटोशूटचा वेगळाच प्रकार समोर आला आहे. ज्यामध्ये तरुण- तरुणी चक्क नाल्यात फोटो काढताना दिसत आहेत. (Latest Marathi News)

सध्या सर्वत्र लग्न सराईची धामधूम सुरू आहे. ज्यामधील अनेक हटके व्हिडिओ सोशल मीडियावर (Viral Video) व्हायरल होत असतात. कधी डान्स करतानाचे, तर कधी हटके एन्ट्रीची सोशल मीडियावर चर्चा होत असते. सध्या एका अशाच प्री- वेडिंग फोटोशूटची (Photoshoot) जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

या फोटोंमध्ये तरुण तरुणी चक्क नाल्यात पोझ देताना दिसत आहेत. अस्वच्छ पाण्यात कचऱ्यामध्ये त्यांनी हसत हसत आपले फोटो काढले आहेत.एक फोटो तर हैराण करणारा आहे, ज्यात कपल रोमान्स करताना दिसतं आहे. एकमेकांना किस करत आहे.बहुतेकांनी हे फोटो फेक असल्याचं म्हटलं आहे. तर अनेकांनी हे फोटो AI मार्फत बनवण्यात आल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, या व्हायरल फोटोची सध्या माध्यमांमध्ये चांगलीच चर्चा रंगली असून नेटकऱ्यांनीही यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जणांनी आता हे फोटोशूट आयुष्यभर लक्षात राहील, अशा मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काही जणांनी बजेट कमी असल्यामुळे असे लोकेशन निवडले का? असा खोचक सवाल उपस्थित केला आहे...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: पुण्यातील गुलटेकडी परिसरात वाहनांची तोडफोड

Devendra Fadnavis: भाजपने पूनम महाजन यांचे तिकीट का कापले? देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं कारण

Maharashtra Politics 2024 : 'त्यांच्या ४८ नाही तर ४९ जागा येतील'; उद्धव ठाकरेंच्या दाव्यावर फडणवीसांचा खोचक टोला

Budh Gochar 2024: मे महिन्यात बुध ग्रहाचं परत एकदा परिवर्तन; ५ राशींच्या जीवनात होणार मोठी घडामोड

Pune CCTV: मास्क लावून आले, धाक दाखवला, सोन्याचं दुकान लुटलं! ते 7 दरोडेखोर नेमके कोण?

SCROLL FOR NEXT