UP News  Saam TV
देश विदेश

UP Encounter: उमेश पाल हत्याकांड प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, पहिली गोळी झाडणारा उस्मान पोलीस एन्काऊंटरमध्ये ठार

Umesh Pal Case: शूटर उस्मानवर 50 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.

साम टिव्ही ब्युरो

UP Encounter : उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये झालेल्या उमेश पालच्या यांच्या हत्याकांड प्रकरणी पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. उमेश पाल हत्याकांडात सहभागी असलेला शूटरला पोलिसांनी चकमकीत ठार केलं आहे. विजय उर्फ ​​उस्मान असे शूटरचे नाव आहे.

प्रयागराजच्या कौंधियारा भागात ही चकमक झाली. शूटर उस्मानवर 50 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. उस्मानने उमेश यांच्यावर पहिली गोळी झाडल्याचे बोलले जात आहे. (Latest News)

उमेश पाल बसपा आमदार राजू पाल यांच्या खून प्रकरणातील साक्षीदार होते. गेल्या शुक्रवारी 24 फेब्रुवारीला न्यायालयातून घरी परतत असताना त्यांच्या घरासमोर हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला.

हल्लेखोरांनी अनेक गोळ्या उमेश पाल यांच्यावर झाडल्या. तसेच हल्लेखोरांनी बॉम्ब हल्लाही केला होता. ज्यात उमेश पाल आणि त्यांच्या सुरक्षेसाठी असलेला पोलीस कर्मचारी संदीप निषाद यांचा जागीच मृत्यू झाला. तर आणखी एक पोलीस कर्मचारी राघवेंद्र गंभीर जखमी झाले होते, त्यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सौरभ दास, आशुतोष रांका यांना जामीन मंजूर

Winter Skin Care: हिवाळा सुरू होण्याआधी स्किन केअरमध्ये करा हे ७ बदल; त्वचा होईल मुलायम आणि चमकदार!

Satara District Bank Election: महायुतीचा जागावाटपाच फॉर्म्युला ठरला, अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी मोठी घडामोड

Diwali Horoscope : दिवाळीत 'या' ३ राशींची चांदीच चांदी! पैसा, प्रगती अन् धनलाभाचे संकेत

Dhasal Movie: 'प्रहार'नंतर ललित प्रभाकरचा नवा अंदाज; 'ढसाळ'चा दमदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT