Pawan Yadav Samajwadi Party leader shot dead in Prayagraj Saam TV marathi news
देश विदेश

Crime : धक्कादायक! अज्ञात हल्लेखोरांनी नेत्याला संपवलं, राजकारणात खळबळ; परिसरात प्रचंड तणाव

Pawan Yadav latest news : प्रयागराजच्या हंडिया भागात समाजवादी पक्षाचे जिल्हा सचिव पवन यादव यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली. बाइकवरून आलेल्या तीन हल्लेखोरांचा शोध सुरू असून CCTV तपासले जात आहेत.

Namdeo Kumbhar

Pawan Yadav Samajwadi Party leader shot dead in Prayagraj : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये समाजवादी पक्षाचे स्थानिक नेते पवन यादव यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र भीतीचं आणि तणावाचं वातावरण पसरलं. पवन यादव यांची हत्या झाल्याची बातमी व्हायरल होताच राजकीय वर्तुळातही मोठी खळबळ उडाली आहे.

उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनेने पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. समाजवादी पक्षाशी जोडलेले स्थानिक नेते पवन यादव यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. स्थानिक मीडियाला मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पवन यादव यांच्यावर अचानक समोरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी अंधाधुंद गोळीबार केला. गोळी लागताच पवन यादव जागीच कोसळले. घटनेनंतर घटनास्थळी प्रचंड धावपळ उडाली आणि स्थानिक लोकांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली. पोलिसांनी संपूर्ण परिसराची नाकाबंदी करत तात्काळ आरोपीचा शोध सुरू केला आहे. आरोपी सध्या फरार आहेत. पवन यादव यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी पवन यादव यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला असून आरोपींच्या शोधासाठी पथके तैणात करण्यात आली आहेत.

हत्त्या नेमक्या कोणत्या कारणावरून झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. जुना वैयक्तिक वाद, राजकीय वैमनस्य की अन्य काही कारण, या सर्व बाजूंनी पोलीस सध्या तपास करत आहेत. घटनास्थळावरील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासण्याचे काम सुरू असून प्रत्यक्षदर्शींची चौकशी केली जात आहे.

सपा नेत्याच्या हत्येनंतर स्थानिक कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळत आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूर जबलपूर हायवेवर ट्रेलरची दुचाकीला धडक, महिला ठार

Maharashtra Weather : पावसाची वाट पाहणाऱ्यांसाठी वाईट बातमी! पुढील ५ दिवस पाऊस गायब? हवामान खात्याने दिला मोठा इशारा

Gauri Aagman : गणपतीच्या कोणत्या बाजूला गौराईची प्रतिष्ठापना करतात, उजव्या की डाव्या? जाणून घ्या पारंपरिक पद्धत

Wednesday Horoscope : कुटुंबाची साथ मिळेल! 5 राशींच्या राशींची आजपासून भरभराट होणार, वाचा बुधवारचे राशीभविष्य

मॅडम, तुम्ही.....सरकार येऊ द्या, तुम्हाला...; बड्या नेत्याचे महिलेसोबतचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

SCROLL FOR NEXT