Madhya Pradesh News Saamtv
देश विदेश

Madhya Pradesh News: भाजप नेत्याची मजुरावर लघुशंका! मुख्यमंत्र्यांनी आरती ओवाळली; माफी मागत धुतले पाय... VIDEO

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. ज्यानंतर मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी तात्काळ आरोपीला अटक करण्याचे आदेश दिले होते.

Gangappa Pujari

Madhya Pradesh News: दोन दिवसांपूर्वी मध्यप्रदेशच्या सिधी जिल्ह्यातील एक किळसवाणा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. यामध्ये एका मुजोर तरुणाने गरीब आदिवासी मजुराच्या अंगावर लघुशंका केल्याचा घृणास्पद प्रकार घडला होता. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती.

या व्हायरल व्हिडिओची दखल घेत मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी तात्काळ आरोपीला अटक करण्याचे आदेश दिले होते. या आरोपीला आता अटक करण्यात आली आहे. तर घटनेतील मजुराला शिवराज सिंग चौहान यांनी त्यांच्या निवासस्थानी बोलावून त्याचे पाय धुतले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांनी पीडित दशमत रावत याला भोपाळ येथील निवासस्थानी येण्याचे आमंत्रण दिले होते. याठिकाणी रावत यांचा रीतसर पाहुणचार करून मुख्यमंत्र्यांनी त्यांचे पाय धूतले आहेत. याचे फोटो सध्या सोशल मीडियावर समोर आले आहेत.

पीडित व्यक्ती आदिवासी समाजाताली असून करौंडी गावचा आहे. तो मजुरीचे काम करतो. गुरुवारी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दशमत यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या घटनेबद्दल माफी मागत त्यांचे पाय धुतले. याचबरोबर, शिवराज सिंह चौहान यांनी दशमत यांच्याकडून त्यांच्या कुटुंबीयांचीही माहिती घेतली.

 "हा व्हिडिओ पाहून मला खूप दु:ख झाले. मी तुमची माफी मागतो. मला जनता ही देवासारखी आहे". अशा शब्दात शिवराजसिंग चौहान यांनी माफी मागितल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या व्यक्तीचे पाय धुतल्याचा व्हिडिओ समोर आता आला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: रश्मी शुक्ला यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

Voter ID जवळ नाही, टेन्शन सोडा, तरीही मतदान करता येणार, ही १२ कागदपत्रेही आहेत ग्राह्य

Cricketer Accident: वेस्टइंडीजच्या स्टार खेळाडूचा भीषण अपघात! कारचा झालाय चुराडा

Pune Politics: मतदानापूर्वीच पुण्यात मनसेला खिंडार, अनेक पदाधिकाऱ्यांनी 'तुतारी' घेतली हाती

१२ डिसेंबरपासून राजासारखं आयुष्य जगणार 'या' राशी; आर्थिक फायद्यासह चांगल्या संधीही मिळणार

SCROLL FOR NEXT