Prashant Kishor
Prashant Kishor Saam Tv
देश विदेश

Prashant Kishor: प्रशांत किशोर यांनी काँग्रेसची ऑफर नाकारली; म्हणाले, माझ्यापेक्षा...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली: निवडणूक रणनीतीज्ज्ञ प्रशांत किशोर (Prashant Kishor) हे काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी जोरदार चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. मात्र, स्वतः प्रशांत किशोर यांनी काँग्रेसची 'ऑफर' फेटाळली आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते रणदीप सूरजेवाला यांनी ट्विट केल्यानंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

प्रशांत किशोर यांनी अलीकडेच २०२४ मधील निवडणुकांसंदर्भात काँग्रेस पक्षश्रेष्ठींसमोर एक 'प्रेझेंटेशन' दिलं होतं. त्यात अनेक सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानंतर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांनी एक समिती स्थापन केली होती. या समितीनं त्यासंदर्भातील अहवाल सादर केला होता. सोनिया गांधी त्यावर निर्णय घेणार होत्या. त्याच दरम्यान रणदीप सूरजेवाला (Randeep Surjewala) यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटनंतर काँग्रेसमध्ये (Congress) पुन्हा हालचालींना वेग आला आहे.

रिपोर्टनुसार, समितीच्या सदस्या प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) के. सी. वेणुगोपाल, रणदीप सूरजेवाला, पी. चिदंबरम, अंबिका सोनी, जयराम रमेश आणि मुकुल वासनिक यांनी प्रशांत किशोर यांच्या सूचनांवर एक सविस्तर अहवाल दिला होता. सूत्रांच्या माहितीनुसार, बहुतांश सूचना या पक्षाच्या दृष्टीने उत्तम असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच पक्षाचे वरिष्ठ नेते प्रशांत किशोर आणि पक्षात त्यांच्या भूमिकेबाबत आपापली मते मांडू शकतात, असेही संकेत देण्यात आले आहेत.

प्रशांत किशोर यांच्यासोबत बैठक आणि चर्चेनंतर काँग्रेस (Congress) अध्यक्षांनी २०२४मधील लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन, एका समितीची स्थापना केली होती. प्रशांत किशोर यांना समितीचे सदस्य म्हणून पक्षात प्रवेश करण्यास सांगितले होते. मात्र, किशोर यांनी नकार दिला आहे. त्यांनी पक्षासाठी केलेले प्रयत्न आणि त्यांनी दिलेल्या सूचनांचे स्वागत करतो, असे सूरजेवाला यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. दुसरीकडे प्रशांत किशोर यांनी स्वतः ट्विट करून काँग्रेसमध्ये प्रवेश करणार नाही, असं जाहीर केलं आहे. काँग्रेसला नेतृत्व आणि सामूहिक इच्छाशक्तीची आवश्यकता अधिक आहे, असंही त्यांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे.

Edited By - Nandkumar Joshi

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: प्रणितीसह सुशीलकुमार शिंदे भाजपच्या वाटेवर? प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ

MI vs KKR, IPL 2024: मुंबईचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात! घरच्या मैदानावर मुंबईचा KKR कडून लाजिरवाणा पराभव

Maharashtra Politics 2024 : पवारांनी गल्ली ते दिल्लीपर्यंत फोडला घाम; पश्चिम महाराष्ट्रात अस्तित्वासाठी संघर्ष

Baramati Politics: विधानसभेतही बारामतीत महाभारत, अजित पवार यांना पुतण्या युगेंद्र देणार आव्हान?

Hardik Pandya Troll: हार्दिकने रोहितलाच केलं प्लेइंग ११ मधून बाहेर! फॅन्सच्या संतप्त प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT