Prashant Kishor Saam Tv
देश विदेश

काँग्रेसला वाचविण्यासाठी प्रशांत किशोर यांचा मास्टर प्लॅन, अध्यक्षपद हे...

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर काँग्रेसमध्ये (Congress) मोठ्या बदलाची मागणी जोर धरू लागली आहे.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर काँग्रेसमध्ये (Congress) मोठ्या बदलाची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान काँग्रेसला पुन्हा रुळावर आणण्यासाठी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी महत्त्वाचा आराखडा तयार केला आहे. काँग्रेसला पुन्हा उभं करण्यासाठी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी केलेल्या काही महत्त्वाच्या शिफारशी केल्या आहेत. प्रशांत किशोर यांनी काँग्रेस अध्यक्ष हा गैर-गांधी कुटुंबातील असावा, असा सल्ला दिला आहे. ते सुचवतात की सोनिया गांधी यूपीए अध्यक्ष म्हणून कायम राहू शकतात आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) पक्षाचे आणि संसदेतील नेत्यांचे नेतृत्व करू शकतात परंतु काँग्रेसचा अध्यक्ष गैर-गांधी कुटुंबातील असावा. त्यांनी काँग्रेस पक्षासाठी 'इंडिया डिझर्व्हज बेटर' अशी मोहीमही मांडली आहे.

काँग्रेसला पुन्हा उभे करण्यासाठी प्रशांत किशोर (Prashant Kishore) यांनी तयार केलेली योजना 'नटराज'ने प्रेरित आहे. नटराज हे भगवान शिवाचे एक रूप आहे, ज्याला विश्वाचा निर्माता, संरक्षक आणि संहारक म्हणून देखील ओळखले जाते. प्रशांत किशोर यांनी सुचवले आहे की काँग्रेसला पुनर्बांधणी करण्यासाठी 6 मूलभूत ठराव करावे लागतील. प्रशांत किशोर यांनी त्यांच्या शिफारशीत स्पष्टपणे म्हटले आहे की, काँग्रेस ही आता लोकशाही संघटना राहिलेली नाही. 65 टक्के जिल्हाध्यक्ष आणि 90 टक्के ब्लॉक अध्यक्षांनी काँग्रेस अध्यक्ष किंवा सरचिटणीस यांच्याशी कोणतीही बैठक घेतली नसल्याचे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.

CWC मध्ये तरुणांना संधी द्यावी

प्रशांत किशोर म्हणतात की, गेल्या 25 वर्षांत काँग्रेसकडे राष्ट्रीय स्तरावरील सदस्यत्व मोहीम तयार नव्हती. प्रशांत किशोर यांनीही काँग्रेसमध्ये तरुणांचा सहभाग वाढवण्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी म्हटले आहे की 66 CWC सदस्यांपैकी फक्त 2 सदस्य 45 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. काँग्रेसची बुडती बोट रोखण्यासाठी प्रशांत किशोर यांनी दिलेला रोड मॅप नक्कीच काँग्रेसच्या फायद्याचा ठरु शकतो. युतीचे कोडे सुटल्यानंतर काँग्रेस नेतृत्वाचीही समस्या सोडवावी लागेल, असे त्यांनी सुचवले आहे.

डिजिटल प्रमोशनवर भर

काँग्रेसला पुन्हा उभं राहण्यासाठी त्यांना परत त्यांच्या स्थापनेच्या सिद्धांतावर काम करावे लागणार असल्याचे प्रशांत किशोर यांनी सुचवले आहे. यासोबतच तळागाळातील कार्यकर्त्यांची फौजही तयार करावी लागणार आहे. त्यांच्या सूचनेमध्ये मीडिया आणि डिजिटल प्रमोशनच्या कामाचाही समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेसने मजबूत नेत्यांसह शॉडो कॅबिनेटची स्थापन करावी, अशी शिफारसही प्रशांत किशोर यांनी केली.

स्थानिक पक्षांशी युती करण्याची सूचना

प्रशांत किशोर यांनी असेही सुचवले आहे की यूपीए 3 बनवण्याऐवजी किंवा एकट्याने लढण्याऐवजी काँग्रेसला काँग्रेस आणि प्लस शोधावे लागतील. ज्या नेत्यांनी आणि प्रादेशिक संघटनांनी राज्यात आपले स्थान निर्माण केले आहे त्यांच्याशी काँग्रेसने हातमिळवणी करावी, अशी शिफारस त्यांनी केली. एक कुटुंब एक तिकीट, काँग्रेस अध्यक्ष आणि काँग्रेस कार्यकारिणीचा निश्चित कार्यकाळ आणि अंतर्गत निवडणुकांमधील हेराफेरी रोखणे यासारख्या अंतर्गत सुधारणांची शिफारसही त्यांनी केली. या योजनेत काँग्रेस पक्षाच्या एक कोटी तळागाळातील कार्यकर्त्यांना जोडण्याच्या कामाचाही समावेश आहे, त्यापैकी 50 लाख तळागाळातील कार्यकर्ते असतील आणि उर्वरित निवडणूक दलाच्या स्वरूपात असतील.

काँग्रेसने मुख्य प्रवाहातील मीडियाला टाळावे, असा सल्ला प्रशांत किशोर यांनी दिला आहे. ते सुचवतात की काँग्रेसने एक शक्तिशाली डिजिटल आर्मी तयार करावी जी भाजपला टक्कर देऊ शकेल. निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेसने 30 कोटी मतदारांना एकत्र आणण्याचे ध्येय ठेवावे, अशी शिफारस त्यांनी केली. गांधी विरुद्ध गोडसे असा विषयही त्यांनी सुचवला आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT