India Alliance Latest News Saamtv
देश विदेश

India Alliance News: महाराष्ट्रात इंडिया आघाडीला मिळणार नवा साथीदार; आता पुढील रणनीती काय असणार?

India Alliance News: इंडिया आघाडीचे नेते देशभरातील वेगवेगळ्या राज्यातील पक्षांना आघाडीत सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

Vishal Gangurde

प्रमोद जगताप, दिल्ली

India Alliance News

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीने मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. इंडिया आघाडीचे नेते देशभरातील वेगवेगळ्या राज्यातील पक्षांना आघाडीत सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आता याच इंडियाला आघाडीला महाराष्ट्रातही नवा साथीदार मिळणार असल्याची शक्यता आहे. या नव्या साथीदाराची साथ मिळाल्यास इंडिया आघाडीची राज्यात ताकद वाढण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत चांगली छाप सोडणारी वंचित बहुजन आघाडी ही इंडिया आघाडीत सहभागी होणार असल्याची शक्यता आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीत घेण्याबाबत शरद पवार अनुकूल असल्याची माहिती हाती आली आहे. याबाबत इंडिया आघाडीच्या दिल्लीतील आगामी बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

इंडिया आघाडीत प्रकाश आंबेडकरांना घेण्याचे प्रयत्न सुरूच असल्याची माहिती आली आहे. दिल्लीच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीच्या सहभागाबाबत घटक पक्षांशी चर्चा होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

प्रकाश आंबेडकरांकडून राहुल गांधींना संविधान महासभेचं निमंत्रण

मुंबईत येत्या २५ नोव्हेंबरला वंचित बहुजन आघाडीने संविधान सन्मान महासभेचं आयोजन केलं आहे. या महासभेसाठी प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांना निमंत्रण दिलं आहे. प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधी यांनी पत्र लिहून महासभेचं निमंत्रण दिलं आहे. या पत्रात आंबेडकरांनी १९९८ मध्ये भारिप बहुजन महासंघाने काँग्रेसला दिलेल्या पाठिंब्याची आठवण करून दिली आहे.

इंडिया आघाडीची लवकरच बैठक

विरोधीपक्षांच्या इंडिया आघाडीच्या नेत्यांची लवकरच एक बैठक होणार असल्याची माहिती हाती आली आहे. इंडिया आघाडीची ही बैठक डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. दरम्यान, जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये इंडिया आघाडीची बैठक झाली. त्यानंतरच्या महिन्यात इंडिया आघाडीची बैठक एकही बैठक झाली. त्यानंतर आता डिसेंबर महिन्यात इंडियाची बैठक होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: धक्कादायक! धावत्या ट्रेनमध्ये विदेशी महिलेसोबत असभ्य वर्तन, बाथरूमपर्यंत पाठलाग अन्....

Homemade Facepacks: उन्हाळ्यात चेहऱ्यावरचे पिंपल्स कसे काढायचे? हे 5 घरगुती फेसपॅक नक्की ट्राय करा

Maharashtra Live News Update: घमुंबई-नागपूर महामार्गावर कारने चौघांना उडवलं

Entertainment News : अभिनेत्याचा २७ व्या वर्षी मृत्यू, घरातच आढळला मृतदेह, नेमकं झालं काय?

MSRTC Jobs: तयारीला लागा! एसटी महामंडळात १८ हजार पदांसाठी बंपर भरती, प्रताप सरनाईकांनी केली घोषणा

SCROLL FOR NEXT