PRAJWAL REVANNA JAIL CELL saam tv
देश विदेश

माजी पंतप्रधानांच्या नातवाचा कारनामा! तुरुंगातील फोनमध्ये सापडले 145 अश्लील व्हिडिओ; देशभरात खळबळ

145+ Obscene Videos Found on Phone in Prajwal Revanna: प्रज्वल रेवन्नाच्या बंगळूर सेंट्रल जेलमधील हाय सिक्युरिटी सेलमधून जप्त मोबाइल आणि पेनड्राइव्हच्या फॉरेन्सिक तपासणीत 145 हून अधिक अश्लील व्हिडिओ आढळल्याची माहिती समोर आली आहे.

Omkar Sonawane

बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला माजी खासदार प्रज्वल रेवन्ना पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रेवन्नाच्या हाय सेक्युरिटी सेलमधून नुकताच एक मोबाइल फोन आणि पेनड्राइव्ह जप्त करण्यात आला होता. या इलेक्ट्रॉनिक उपकरणांची फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली असता पोलिसांना धक्कादायक माहिती समोर आली आहे.

फॉरेन्सिक रिपोर्टनुसार, मोबाइल फोनमध्ये तब्बल 145 हून अधिक अश्लील व्हिडिओ क्लिपस आढळून आल्या आहेत. तसेच मोबाइलमध्ये ओटीटीवरील सीरिज आणि चित्रपटही साठवण्यात आले होते. तर पेनड्राइव्हमध्ये 100 हून अधिक अश्लील क्लिप्स असल्याचे तपासात समोर आले आहे. इतकेच नाही तर मोबाइलमध्ये जेलबाहेरील व्यक्तींशी झालेल्या संभाषणांच्या ऑडिओ देखील आढळल्या आहेत. एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, मोबाइलच्या कॉल रेकॉर्डची तपासणी केली असता मध्यस्थांच्या माध्यमातून रेवन्ना आपल्या कुटुंबातील सदस्यांशी संपर्कात असल्याचे समोर आले आहे. तसेच एका महिला मैत्रिणीलाही त्याने थेट फोन केल्याचे तपासात आढळले आहे.

केंद्रीय गुन्हे शाखेच्या सिक्युरिटी डिव्हिजनने 11 ऑगस्ट रोजी जेलमधील बॅरकची अचानक तपासणी केली होती. या तपासणीदरम्यान पोलिसांनी मोबाइल फोन, सिमकार्ड, चार्जर आणि एक नोटबुक जप्त केली. त्यानंतर या उपकरणांमधील डेटा बाहेर काढून त्याची फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली. सेलमधून जप्त करण्यात आलेल्या नोटबुकमध्ये सहा ते सात फोन नंबर आढळले. यामध्ये रेवन्नाच्या कुटुंबातील सदस्यांचे तसेच एका महिला मैत्रिणीचे नंबर असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, रेवन्नाने मोबाइल फोन आपला असल्याचे नाकारले आहे. सेलमधील कैदी हा मोबाइल आलटून-पालटून वापरत असल्याचा दावा त्याने केला. मात्र, सेलमधून सापडलेली नोटबुक आपली असल्याचे रेवन्नाने मान्य केल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्याने दिली.

कॉल रेकॉर्डमधील व्यक्तींना पोलिसांची नोटीस

मोबाइलच्या कॉल हिस्ट्रीमध्ये आढळलेल्या नंबरची पोलिसांकडून चौकशी करण्यात येणार आहे. या नंबरशी संबंधित व्यक्तींना नोटीस बजावली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. रेवन्नापर्यंत मोबाइल फोन कसा पोहोचला आणि जेलमध्ये त्याचा वापर कोणाच्या माध्यमातून केला जात होता, याचा तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ‘चलो मुंबई’च्या अनुषंगाने लातूरमध्ये सकल मराठा समाजाची व्यापक बैठक.

पाकिस्तान हादरलं! लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, २३ पेक्षा जास्त जवान ठार

Hair Care: फ्रिझी केसांपासून मिळवा सुटका! हेअर केअर रुटीनमध्ये 'या' ७ गोष्टींचा करा समावेश, केस होतील मऊ आणि शाइनी

दीड, ३, ५, ७ आणि १० दिवसच गणपती का बसवतात? जाणून घ्या यामागील परंपरा

Mental Health : टेन्शन अन् थकव्याने हैराण आहात? सकाळच्या या 9 सवयी नक्की करून पाहा

SCROLL FOR NEXT